हिंदु जनजागृती समितीकडून यवतमाळ येथील दैनिक ‘सिंहझेप’च्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्ताने शुभेच्छा !

श्री. विजय बुंदेला (डावीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे

यवतमाळ, २४ जानेवारी (वार्ता.) – निर्भीड, निष्पक्ष, निस्पृह दैनिक ‘सिंहझेप’ वृत्तपत्राच्या ५५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून २३ जानेवारी या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे यांनी ‘सिंहझेप’चे जिल्हा प्रतिनिधी

श्री. विजय बुंदेला यांना ‘पचनसंस्थेच्या विकारांवर आयुर्वेदिक उपचार’ हा सनातनचा ग्रंथ भेट दिला. ग्रंथातील काही भाग वाचल्यानंतर श्री. बुंदेला म्हणाले, ‘‘मला पोटाच्या संदर्भात अनेक व्याधी आहेत, त्या घालवण्यासाठी हा ग्रंथ मला उपयुक्त ठरेल, ग्रंथामध्ये पुष्कळ छान माहिती आहे, त्याचे मी नियमित वाचन करीन.’’ शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात आलेल्या अन्य मान्यवरांनीही या ग्रंथांचे वाचन केले.