गोहत्येच्या प्रकरणी १५ वर्षे पसार असणार्‍या अखलाक याला अटक

अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

डावीकडे आरोपी अखलाक

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – गेली १५ वर्षे हरियामध्ये गोहत्येच्या प्रकरणी पसार असणार्‍या अखलाक याला सहारनपूर पोलिसांनी अटक केली आहे. (एका आरोपीला शोधण्यास पोलिसांना १५ वर्षांचा कालावधी लागतो, हे पोलिसांचे अपयश नव्हे का ? – संपादक) त्याच्याकडून एक पिस्तुल आणि २ काडतुसे जप्त करण्यात आली. अखलाकवर हरियामध्ये अन्य ५ गुन्हेही नोंद आहेत.