श्रीलंकेतील तमिळांना अधिकार देण्याची तरतूद असणारी १३ वी सुधारणा लागू करा !

श्रीलंकेतील तमिळी लोकप्रतिनिधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या उत्तर भागातील प्रमुख तमिळ लोकप्रतिनिधींनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून १३ वी सुधारणा कृतीत आणण्याची मागणी केली आहे. वर्ष १९८७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती जे.आर्. जयवर्धने यांच्यात झालेल्या करारामध्ये १३ वी सुधारणा लागू करण्याचे सूत्र होते. या संशोधनामुळे श्रीलंकेतील तमिळांना अधिकार देण्याची तरतूद आहे.

श्रीलंकेतील ज्येष्ठ तमिळ नेते आणि ‘तमिल नॅशनल अलायन्स’चे नेते आर्. संपतन् यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने येथील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांची भेट घेऊन वरील मागणीविषयीचे पत्र पंतप्रधान मोदी यांना देण्यासाठी दिले.