लाहोर येथील स्फोटात ३ जण ठार, तर २५ जण घायाळ

लाहोर (पाकिस्तान) – येथील लोहारी गेट जवळ दुपारी झालेल्या स्फोटामध्ये ३ जण ठार, तर २५ जण घायाळ झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्फोटात येथील घरे, दुकाने आणि वाहने यांची हानी झाली. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.