गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याचेच हे लक्षण ! – संपादक
पुणे – चोरी, दरोडे, तसेच घरफोड्या यांसह पुण्यात हत्यांचे प्रमाण अधिकच वाढत आहे. पुणे शहरात वर्ष २०२१ मध्ये हत्येच्या १०० घटना घडल्या. यातील ९६ गुन्ह्यांचे अन्वेषण पूर्ण झाले. तुलनेत वर्ष २०२० मध्ये शहरात एकूण ७७ हत्यांच्या घटना घडल्या होत्या. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मकोका कारवाई चालू केली. त्यांनी ६० हून अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर मकोकाची कारवाई केली. ‘एम्पीडीए’नुसार अनेक सराईत गुन्हेगारांना कारागृहात पाठवले; परंतु तरीही पुणे शहरात गेल्या वर्षी हत्येच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते.
(साभार : ईटीव्ही भारत संकेतस्थळ)