ओंकारेश्वर आणि नीरज विष्णोई यांची स्वीकृती !
|
मुंबई – हिंदु धर्म, मंदिर आणि महिला यांवरील टीका करणार्यांना धडा शिकवण्यासाठी ओंकारेश्वर यांनी ‘सुल्ली डिल’, तर नीरज विष्णोई यांनी ‘बुली बाई’ ॲप सिद्ध केले आहे, अशी माहिती देहली पोलीस सायबर सेलचे पोलीस उपअधीक्षक पी.एस्. मल्होत्रा यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. नीरज विष्णोई हे ओंकारेश्वर यांनी सिद्ध केलेल्या गटाचे सदस्य होते. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. (गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनेक समाजकंटक आणि हिंदुद्वेषी धर्मांध यांच्याकडून हिंदु धर्म, संत, देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य भाषेत टीका करून त्यांचे विडंबन करण्यात येत आहे. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून तत्परतेने दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही. उलट पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांना दमदाटी करून त्यांची मुस्कटदाबी केली जाते. – संपादक)
‘सुल्ली डिल’ ॲप सिद्ध करणारे ओंकारेश्वर यांनी पोलिसांना सांगितले की, ट्विटरवर हिंदु आणि मंदिरे यांच्या विरोधात बोलणार्या मुलींची छायाचित्रे या ॲपवर बोली लावण्यासाठी टाकण्यात आली होती. अशा मुलींना ट्विटरवर शोधून त्यांची छायाचित्रे उचलून ‘सुल्ली डिल’ ॲपवर बोली लावायचो. यातील जवळपास १०० टक्के मुली मुसलमान होत्या.
बी.सी.ए.चे शिक्षण घेतल्यानंतर ओंकारेश्वर हे मुक्त पत्रकार म्हणून काम करत होते. त्यांना संगणकाचे चांगले ज्ञान आहे. ते लोकांसाठी संकेतस्थळ विकसित करण्यासह इतर कामे करतात. यातून त्यांना चांगले पैसे मिळतात. अनेक मुली मंदिरे, देव आणि हिंदु धर्म यांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याचे त्यांना ट्विटरवर पाहिले होते. याविषयी त्यांनी अनेक ऑनलाईन फ्लॅटफॉर्मवर तक्रारही केली होती; पण त्याचा उपयोग न झाल्याने नंतर ‘अशा मुलींना धडा शिकवला पाहिजे’, असे त्यांना वाटले. यासाठी ते जानेवारी २०२१ मध्ये ‘ट्रेड महासभा’ नावाच्या ट्विटरवर असलेल्या गटामध्ये सहभागी झाला होते. त्यात त्यांच्यासारखे जवळपास ५० सदस्य होते. येथे त्यांनी ठरवले की, मुसलमान महिलांना ‘ट्रोल’ करायचे.
नीरज विष्णोई हे मूळचे नागौर, राजस्थानचे आहेत. सामाजिक संकेतस्थळांवर इतर समाजातील तरुणांनी खास करून मुसलमानांनी हिंदु देवता अणि मंदिरे यांच्या नावाने अनेक अश्लील गट सिद्ध केले आहेत. तेथे हिंदु महिलांना लक्ष्य करण्यात आले. हिंदु धर्म, मंदिरे आणि महिला यांविषयी लोक अश्लील संवाद करायचे. या संदर्भात ऑनलाईन तक्रार करूनही त्याकडे कुणी लक्ष न दिल्याने याचा बदला घेण्यासाठी नीरज यांनी ‘बुली बाई’ ॲप सिद्ध केले होते.
या ॲपवर हिंदुविरोधी विचारसरणी असलेल्या काही हिंदु महिलाही बोली लावत होत्या. त्यासाठी आधीपासून चालू असलेल्या ‘सुल्ली डील्स’चे कोडिंग कॉपी करण्यात आले. नेमके हेच ॲप ‘ग्राफिक्स एडिट’ करून सिद्ध केले होते. नीरज यांनी ॲपवर १०० हून अधिक महिलांची प्रोफाइल सिद्ध केले होते. त्यांपैकी बहुतांश ‘सेलिब्रिटी’, पत्रकार आणि कार्यकर्ते होते. पोलीस बोली लावणार्यांचे ओळखपत्रही पडताळत आहेत. नीरज हे सामाजिक संकेतस्थळावर हिंदुविरोधी विचारसरणी असलेल्या महिलांची माहिती घेत असे. त्यांची छायाचित्रे, वय, विधाने आणि वैयक्तिक माहिती काढून ॲपवर अपलोड करत होते. १०० हून अधिक सेलिब्रिटी, पत्रकार, राजकारणी आणि कार्यकर्ते यांची ‘प्रोफाइल’ सिद्ध केली आहेत.