‘१० ते १८ ऑक्टोबर २०१८ या नवरात्रीच्या कालावधीत आश्रमातील मी रहात असलेल्या खोलीत दिवा लावला होता. ‘नवरात्रीतील नऊ दिवस वातावरणात देवीचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते’, असे सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथात लिहिले आहे.
त्यानुसार मी खोलीत लावलेल्या दिव्याकडे वातावरणातील देवीतत्त्व आकृष्ट झाल्यामुळे त्याच्या छायाचित्रांत ज्योतीच्या प्रभावळीचा आणि निरांजनाचा रंग लालसर, म्हणजे देवीतत्त्वाच्या रंगाचा दिसत आहे. नवरात्र संपल्यावर लावलेल्या दिव्याच्या छायाचित्रात ज्योतीच्या प्रभावळीचा आणि निरांजनाचा रंग पिवळसर दिसत आहे. देवीच्या कृपेने खोलीत लावलेल्या दिव्याच्या माध्यमांतून मला हे प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाले. याविषयी मी देवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’ – सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |