‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) या साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सत्संगात सूक्ष्मातून उपस्थित असून ते साधक देत असलेला आढावा मनापासून ऐकत आहेत’, असे दिसणे
‘१८.४.२०२६ या दिवशी रामनाथी आश्रमात सौ. स्वाती शिंदे सकाळी ११ ते १२ या वेळेत आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत होत्या. मी ११.३० वाजता सहजच डोळे बंद करून बसले होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सत्संगात उपस्थित असून ते साधक देत असलेला आढावा मनापासून ऐकत आहेत.’ ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. मी त्वरित कृतज्ञता व्यक्त केली.

२. शरिरावर रोमांच येणे आणि आढावा संपेपर्यंत ‘ब्रह्मरंध्रातून थंड लहरी शरिरात जात आहेत’, असे जाणवणे
वरील दृश्य पाहून माझ्या शरिरावर रोमांच आले. आमचा आढावा संपेपर्यंत माझ्या ब्रह्मरंध्रातून थंड लहरी शरिरात जात होत्या. जणू वातानुकूलित यंत्र (‘एअर कंडिशनर’) लावल्याप्रमाणे वातावरण थंड झाले होते. माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
या अनुभूती दिल्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती राजश्री रमेश भगत, उरण, रायगड. (१८.४.२०२६) ॐ
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !