‘उद्या आषाढ शुक्ल एकादशी (२५.७.२०२६) या दिवशी माझी आई सौ. वैशाली मुद्गल हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. वैशाली मुद्गल यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. इतरांना साहाय्य करणे
‘मी पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करत असतांना माझी वैयक्तिक कामे करण्यासाठी आई मला पुष्कळ साहाय्य करत असे. ती मला ‘मी तिची मुलगी आहे, या नात्याने नाही, तर एका साधिकेला साहाय्य करत आहे’, या भावाने साहाय्य करायची.
२. सेवेची तळमळ

आईला आध्यात्मिक त्रास असूनही त्यावर मात करून ती सेवा आणि साधना आनंदाने करते.
३. साधनारत रहाणे
माझा आणि माझ्या बहिणीचा (पूर्वाश्रमीची गौरी मुद्गल, आताची सौ. गौरी कोकरे हिचा) विवाह झाल्यावर आईला थोडासा एकटेपणा जाणवू लागला. तेव्हा तिला थोडा त्रासही झाला; मात्र आता ‘स्वतःला गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी अर्पण व्हायचे आहे’, हे तिने ध्येय ठेवले आहे. त्यामुळे ती आनंदाने साधना करत आहे.
४. आई पुष्कळ चांगल्या पद्धतीने भावजागृतीचा प्रयोग करते.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
अ. मला गर्भधारणा झाल्यावर आई मला सांगायची, ‘‘गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण कर. नामजप कर. घरात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावून ठेव.’’
आ. ‘आईमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ती नामजप, प्रार्थना, तसेच सेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करत असते. मलाही ती अनेक वेळा गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाण्यासाठी सांगते.
मी पुष्कळ भाग्यवान आहे की, ‘मला अशी आई मिळाली.’ ‘आईची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होवो’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते.’
– सौ. अमृता राजू सोनटक्के (सौ. वैशाली मुद्गल यांची मुलगी), बेळगाव (३.६.२०२६)
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !