कोल्हापूर, ८ जानेवारी (वार्ता.) – आलिशान चारचाकी गाड्यांच्या ‘नंबर प्लेट’मध्ये खाडाखोड करून त्याची विक्री करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ कोटी रुपयांच्या ३१ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अब्बास अब्दुल करीम दुकानदार, यश देसाई आणि खलिद अहमद लियाकत सारवान अशी कह्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. हे सर्व बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
कोल्हापुरातील एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचे अन्वेषण करत असतांना कोल्हापूर पोलिसांनी ही चोरी उघडकीस आणली. या प्रकरणी पोलिसांनी वरील तिघांना कह्यात घेऊन आसाम, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि देहली येथून चोरी करण्यात आलेल्या ३१ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.