१. सौर यागाच्या वेळी यज्ञकुंडाजवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची पावले उमटलेली दिसणे
‘३.३.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सौर याग झाला. त्या दिवशी मी संध्याकाळी आश्रमात पोचलो. मला कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर भेटल्या. त्यांनी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांतून पाझरणार्या द्रव्यामुळे उमटलेली त्यांची पावले दाखवली. त्या वेळी मला जाणवले, ‘सौर याग, म्हणजे तेजतत्त्वाचे रूपांतर जलतत्त्वात (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांतून पाझरणारे द्रव्य) झाले. चरण उमटणे, म्हणजे त्यांचे रूपांतर पृथ्वीतत्त्वात झाले.
२. साधकांतील भावानुसार देव त्यांना देत असलेल्या अनुभूती
अ. ज्या साधकांना पृथ्वीतत्त्वाची आवश्यकता होती, त्यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे उमटलेले चरण दिसले.
आ. ज्या साधकांना तेजतत्त्वाची आवश्यकता होती, त्यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ तेजस्वी दिसल्या.
इ. काही साधकांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, म्हणजे वहाणारी प्रेमळ गंगामाता दिसली असणार.
ई. ईश्वर किती दयाळू आहे पहा ! साधकांना त्या चरणांच्या बाजूला आकाशतत्त्वरूपी सूक्ष्म चरणही दिसले. ते चरण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे होते. त्याही सूक्ष्मदेहाने तेथे उपस्थित होत्या.’
– श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे, फोंडा, गोवा. (२६.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |