पुणे – ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य आस्थापनाने विकसित केलेल्या ‘मल्टी टेरेन आर्टिलरी गन एमआर्ग – १५५ बीआर’ या संपूर्ण स्वदेशी तोफखाना यंत्रणेचे उद्घाटन पुणे येथे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. या वेळी भारताचे सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या आस्थापनाचे अध्यक्ष बाबा एन्. कल्याणी उपस्थित होते. देशाच्या संरक्षणार्थ भविष्यातील सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम दर्जाची संरक्षण सामग्री निर्माण करण्यासाठी भारतीय संरक्षणदलाकडून मला नेहमीच मार्गदर्शन मिळते. त्यामुळे या उपक्रमासाठी योगदान देणे शक्य झाले, असे ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या आस्थापनाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा एन्. कल्याणी यांनी सांगितले.
Here are glimpses of our unveiling ceremony of the Multi-terrain Artillery Gun (MArG) 155 – BR by our honorable Defence Minister, @rajnathsingh, on Day-1 of PANEX-21. And, it was a proud moment for us, as our Indian Army Chief M. M Naravane, also visited our stall.@adgpi #PANEX21 pic.twitter.com/rNwcwrDjLh
— Kalyani Strategic Systems Limited (@KSSLindia) December 21, 2021