बेळगाव, २१ डिसेंबर – पूर्वअनुमती घेतलेल्यांनाच बेळगाव येथील सुवर्णसौंध परिसरात आंदोलन करण्यास मुभा असणार आहे. याच समवेत बेळगाव शहर आणि तालुक्यात १४४ नुसार जमावबंदीचा आदेश घोषित करण्यात आला आहे. ही घोषणा पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी केली आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यात ५ हून अधिक जणांनी एकत्रितपणे फिरू नये, शस्त्र घेऊन फिरू नये, कुणीही प्रक्षोभक वक्तव्ये करू नयेत, व्यक्ती किंवा संघटना यांच्याविषयी तेढ निर्माण होईल, असे भाष्य करू नये, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.