२९ जुलै २०२६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

एक साधक : ‘गुरुदेवा, माझ्या बाबांची स्थिती वयोमानामुळे पुष्कळ खालावलेली आहे. ते चालूही शकत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत. बाबांना वयोमानानुसार आणि त्यांना वेगवेगळे आजार असल्यामुळे त्यांची शक्ती न्यून झाली आहे. त्यांना हातात कोणतीही वस्तू धरता येत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांना सतत साहाय्य करावे लागते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ते अखंड नामजप करतात का ?
एक साधक : नाही. त्यांची तशी स्थिती नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही त्यांची कुठलीही सेवा करत असतांना त्यांना सतत ‘नामजप चालू आहे ना ?’, असे विचारत रहायचे. तुम्ही बाबांशी बोलत असतांना ‘नामजप चालू आहे ना ?’, असेच विचारायचे. तोच एक मार्ग आहे. त्यांचे प्रारब्ध तीव्र आहे आणि नामजप केल्यावर प्रारब्ध थोडे थोडे न्यून होते. बाबा नामजप करू शकत नसतील, तर भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवावा, म्हणजे तो त्यांना ऐकू येईल. नंतर हळूहळू त्यांनाही नामजप करण्याची सवय होईल आणि तेसुद्धा नामजप करू लागतील.
एक साधक : सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (वय ६२ वर्षे) यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावून ठेवायला सांगितला होता. त्याप्रमाणे तो त्यांच्या खोलीत अखंड चालू असतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. तुमचे बाबा झोपले असले, तरीही त्यांच्या शेजारी नामजप लावून ठेवायचा.’
एक साधक : हो.’
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !