श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधना शिकवून साधनेविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्या बहीणीनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधना शिकवून साधनेविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांची बहीण सौ. शीतल अभय गोगटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

ताई (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ),

सौ. शीतल गोगटे

प्रथम मी तुझ्या चरणांवर मस्तक ठेवून आशीर्वाद मागते की, या घोर आपत्काळात तूच आमच्याकडून साधना करवून घे. तुझ्याविषयी जेवढे लिहावे, तेवढे न्यूनच आहे. प्रथम मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते की, त्याने आम्हाला देवीस्वरूप बहीण दिली.

ताई, तुझ्या कृपेमुळेच मी साधनेत आले. तू मला ‘साधनेची प्रत्येक पायरी कशी चढायची ?’, हे शिकवले. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू कसे शोधून काढायचे ? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाला प्रार्थना कशा करायच्या ?’, हेही तू मला शिकवले. ‘प्रत्येक गोष्टीत देव कसा बघायचा ?’, हे तूच शिकवले. ‘तूच आमच्यासाठी सर्वस्व आहेस’, असे मला वाटते. पू. आई (सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७३ वर्षे)) आणि पू. बाबा (सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे (वय ७८ वर्षे)) यांनीही माझ्यावर चांगले संस्कार केले; पण ताई, तू आमची मोठी बहीण म्हणून आमच्यावर साधनेचे उत्तम संस्कार केलेस. त्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकले. मला साधनेत काही अडचण आली, तर तू इतक्या सुंदर प्रकारे समजावून सांगतेस की, माझ्या डोळ्यांतून पाणी येते आणि मला ‘कृतज्ञता व्यक्त करावी’, असे वाटते. अशा माझ्या आध्यात्मिक ताईला मी वाढदिवसानिमित्त भावपूर्ण नमस्कार करते.

गुरुदेवा, (डॉ. जयंत बाळाजी आठवले), तुम्हीच मला अशी बहीण दिली; म्हणून तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. शीतल अभय गोगटे (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची बहीण, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), मिरज, जिल्हा सांगली. (१५.१२.२०२१)