दासबोध अध्ययन मंडळाच्या वतीने मिरज येथे ‘दासबोध स्नेहमेळावा’ भावपूर्ण वातावरणात पार पडला !

‘दासबोध स्नेहमेळाव्या’त मार्गदर्शन करतांना श्री. शरदबुवा रामदासी आणि उपस्थित मान्यवर

मिरज, ११ डिसेंबर (वार्ता.) – श्रीसमर्थ सेवा मंडळ संचालित श्रीमद् ग्रंथराज ‘दासबोध’ अध्ययन यांच्या वतीने मिरज येथे ९ डिसेंबर या दिवशी ‘दासबोध स्नेहमेळावा’ काशीविश्वेश्वर देवालय येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात श्री. शरदबुवा रामदासी यांचे मार्गदर्शन लाभले. या मेळाव्यासाठी समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ, श्री. शामराव साखरे, अनुराधाताई मोडक, सौ. ज्योति कोरबू यांची प्रमुख उपस्थिती होती, तर मेळाव्यास ११० समर्थभक्त, श्रीदासबोधप्रेमी आणि वाचक उपस्थित होते.