आरोपीने मुलाची हत्या करण्याची धमकी देत पीडितेवर केला बलात्कार !
देशात धर्मांधांकडून हिंदु महिलांवर राजरोसपणे बलात्कार आणि त्यांचे धर्मांतर करणे चालू आहे. त्यामुळे ‘आपण भारतात रहातो कि पाकिस्तानमध्ये ?’, असा प्रश्न हिंदूंना पडल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक

कटिहार (बिहार) – जिल्ह्यामध्ये शाह आलम याने एका दलित महिलेचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले आणि मुलाची हत्या करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. (अशा धर्मांधांना शरीया कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यायला हवी ! – संपादक) या प्रकरणी पीडितेने पोलीस तक्रार केली असून पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. ‘या प्रकरणाचे सखोल अन्वेषण चालू आहे. अन्वेषणानंतर आरोपींवर नियमाप्रमाणे कारवाई होईल’, असे पोलिसांनी सांगितले आहे. (तक्रार आल्यावर हिंदूंना तत्परतेने अटक करणारे देशभरातील पोलीस धर्मांधांविषयी मात्र नेहमीच बोटचेपी भूमिका घेतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
१. पीडिता बंगालच्या मालदा येथील रहाणारी असून बिहारमध्ये ‘शिक्षणसेवक’ या पदावर कार्यरत आहे. १२ वर्षांपूर्वी हिंदु पद्धतीने तिचे लग्न झाले होते आणि तिला एक ४ वर्षांचा मुलगा आहे.
२. पीडितेने सांगितले की, ‘आरोपी रात्रभर तिचे शोषण करायचा आणि मारहाण करायचा. याविषयी इतरांना सांगितल्यास तिच्या मुलाची हत्या करण्यात येईल’, अशी त्याने धमकी दिली होती.
३. पीडितेने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी हा तिच्या पतीचा मित्र आहे. तो जवळीक वाढवण्यासाठी तिच्या शाळेतही यायचा. तिने त्याच्याशी परिचय वाढवण्यास नकार दिला. तेव्हा तो काही निमित्ताने त्याच्या आई-वडिलांना तिच्या घरी पाठवायचा. कधी कधी तो त्याच्या आईसमवेत पीडितेच्या घरी यायचा.
४. शाह आलम हा तारिक, जुल्फिकार, अमीन आणि त्याचा जावई यांच्या समवेत ४ जुलै या दिवशी एक चारचाकी गाडी घेऊन पीडितेच्या घरी आला. त्यांनी तिला गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेले आणि अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केले.
५. यानंतर ५ जुलै या दिवशी पीडितेला बरसोई न्यायालयाच्या बाहेर गाडीत बसवून ठेवले. तेथे इंग्रजीमध्ये लिहिलेल्या एका प्रतिज्ञापत्रावर तिची बलपूर्वक स्वाक्षरी घेऊन तिला इस्लाम स्वीकारायला लावला. त्या प्रतिज्ञापत्रात तिचे नाव ‘फातिमा’ लिहिण्यात आले. त्यानंतर ती आणि तिचा मुलगा यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आले अन् तेथे मारहाण करून पीडितेवर बलात्कार करण्यात आला.
६. पीडितेला साहाय्य करणारे कटिहार येथील संस्कृती संरक्षण परिषदेचे महामंत्री विनय भूषण यांनी ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाला सांगितले की, हे प्रकरण नोंदवण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागला. पीडिता अनेक दिवसांपासून दलितांसाठी बनवण्यात आलेले विशेष ठाणे आणि पोलीस अधीक्षक यांना न्याय मिळण्यासाठी विनंती करत होती; परंतु तिला खोटे आश्वासन देण्यात येत होते. (अशा पोलिसांना सरकारने तात्काळ पदच्युत करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक) पोलिसांनी प्रकरण नोंदवले; परंतु अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही.
हिंदूंचे धर्मांतर करणे, हा धर्मांधांचा मुख्य व्यवसाय !
पीडिता म्हणाली, ‘‘धर्मांधांच्या आपसांतील चर्चेतून मला समजले की, धर्मांतर करणे, हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यांनी अशा प्रकारे अनेक हिंदु मुलींचे धर्मांतर केले आहे. या लोकांचे आतंकवाद्यांशीही संबंध आहेत.’’ (धर्मांधांच्या षड्यंत्राची माहिती पोलिसांना नाही कि पोलिसांचे धर्मांधांशी काही लागेबांधे आहेत ? याचा सरकारने शोध घेणे आवश्यक आहे ! अशा पद्धतीने हिंदु महिलांचे केले जाणारे धर्मांतर पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) पीडितेने असेही सांगितले की, तिच्या जिवाला धोका असून आरोपींनी तिचे जगणे कठीण केले आहे. ते तिच्यासमवेत काहीही करू शकतात. या प्रकरणी पीडितेने ‘आरोपींवर विशेष मागासवर्गीय कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण