यश कुणाच्या मालकीचे नाही. जे कुणी आपले काम प्रयत्नपूर्वक आणि निष्ठेने करतात, यश त्यांच्या जवळ असते. आज केलेले सत्कर्मच उद्याचे भविष्य आहे.
वेळेचे महत्त्व
वेळ हा फुकट आहे; पण अमूल्य आहे. तो विकत घेता येत नाही. मिळवता येतो; पण साठवता येत नाही; पण जगात येतो एकदा. जर वेळ गमावला, तर पुनःपुन्हा मिळविता येत नाही; म्हणून प्रत्येक क्षण जगा, आनंदी रहा आणि आनंदाने जगा. नेहमी आदर्श बनण्याठी प्रयत्न करा; पण ‘मी आदर्श आहे’, हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवू नका.
(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान’, २१.४.२०१८)