उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), ४ डिसेंबर (वार्ता.) – करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत मंगेश्वर मंदिरात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासकीय योजनेतील ४०० लाभार्थ्यांना १७ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सर्वश्री बाळासाहेब नलवडे, विक्रम चौगुले, केरबा माने, योगेश लोहार, अजित चव्हाण, मनीष चौगुले यांसह अन्य उपस्थित होते.