गेल्या ५ वर्षांत ६ लाखांहून अधिक भारतियांचा नागरिकत्वाचा त्याग !

नागरिकत्वाचा त्याग का केला, याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना काढायला हव्यात. सर्वधर्मसमभावाचा बुरखा आणि मतांसाठी लांगूलचालन करण्याची वृत्ती सोडल्यास इतर अनेक गोष्टी सुधारण्यासाठी वाव मिळेल ! – संपादक

पुणे – गेल्या ५ वर्षांत ६ लाख ८ सहस्र १६२ नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना दिली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १ कोटी ३३ लाख ८३ सहस्र ७१८ भारतीय नागरिक सध्या परदेशात वास्तव्यास आहेत. गेल्या ५ वर्षांत १० सहस्र ६४५ जणांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी विनंती केली आहे, त्यापैकी ४ सहस्र १७७ नागरिकांचा विनंती अर्ज मान्य केला आहे.