६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. मैथिली स्वप्निल नाटे (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मैथिली स्वप्निल नाटे ही या पिढीतील एक आहे !

कु. मैथिली नाटे

(‘वर्ष २०१९ मध्ये कु. मैथिली हिची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती.’ – संकलक)

ठाणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मैथिली नाटे हिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्री. स्वप्नील सुरेंद्र नाटे (वडील), ठाणे

श्री. स्वप्नील नाटे

१. नम्रता

‘गेल्या काही मासांपासून मैथिलीच्या बोलण्यातील नम्रता वाढली असल्याचे लक्षात येते. आता ती आम्हाला ‘तुम्ही हे करू शकाल का ? तुम्ही हे बोलू शकाल का ? तुम्ही हे कराल का ?’, असे विचारते.

२. प्रगल्भता

काही प्रश्नांची उत्तरे ती एखाद्या मोठ्या व्यक्तीप्रमाणे अन् अध्यात्मामधली जाणकार असल्याप्रमाणे देते.

३. प्रेमळ

ती जयतीची (धाकट्या बहिणीची (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)) पुष्कळ काळजी घेते. जयतीकडून काही चूक झाली, तर ती आईप्रमाणे तिच्यावर रागावते; पण त्यात तिचे प्रेम जाणवते.

४. स्वीकारण्याची वृत्ती

मागच्या वर्षी सप्टेंबर मासात काही प्रसंगांमुळे अकस्मात् तिची शाळा पालटावी लागली; पण या सर्व परिस्थितीमध्ये तिच्या मनात काहीच प्रतिक्रिया नव्हत्या. तिने सर्व गोष्टी छान स्वीकारल्या आणि नवीन परिस्थितीशी पटकन जुळवून घेतले. शाळेतील मुले, वर्गशिक्षिका, शाळेचा परिसर, मराठी माध्यमातून अकस्मात् इंग्रजी माध्यमात पालटलेला अभ्यास इत्यादी सर्व गोष्टी तिने स्वीकारल्या. तिने इंगजी माध्यमातील नवीन अभ्यासक्रम स्वीकारून त्यात चांगले गुणही मिळवले.

५. भाव

अ. तिची परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु अनुताई (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. एखादी गोष्ट ‘त्यांनी सांगितली आहे’, असे तिला सांगितल्यावर ती कुठलीही प्रतिक्रिया न देता तत्परतेने ती गोष्ट कृतीत आणते. एकदा ती सेवाकेंद्रात काही दिवस रहायला गेली होती. तिथे सद्गुरु अनुताई ज्या पद्धतीने नामजपादी उपाय करतात, त्याच पद्धतीने ती आम्हा सगळ्यांना नामजपादी उपाय करायला सांगते. सेवाकेंद्रात असतांना ज्या गोष्टी तिच्या लक्षात आल्या, त्या तिने लगेच कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी तिच्या अंगाला थोडी खाज सुटत होती. त्या वेळी मी तिला ‘घामोळ्या येऊ नयेत’, यासाठीची पावडर लावूया’, असे म्हणालो; पण ती मला म्हणाली, ‘‘नको. सद्गुरु अनुताईंनी दिलेली विभूती लावूया.’’ तेव्हा तिने सद्गुरु अनुताईंनी दिलेली विभूती तिच्या सर्वांगाला चोळली.

आ. एकदा जयतीने परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र खिडकीमधून खाली टाकले. त्या वेळी मी मैथिलीला म्हणालो, ‘‘ते छायाचित्र पहिल्या माळ्यावर अडकले आहे. नंतर आपण शिडी घेऊन ते काढूया.’’ तेव्हा तिने ‘नाही. मला आत्ताच ते छायाचित्र हवे आहे. तुम्ही ते लगेच काढून आणा’, असा हट्टच धरला. तिच्या हट्टामुळे मी खाली गेलो. तेव्हा मला ते छायाचित्र सहजतेने उभे राहूनच काढता आले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र खाली पडल्यामुळे तिला फार वाईट वाटले आणि खंतही वाटत होती’, असे तिच्या बोलण्यातून मला जाणवत होते.’

सौ. ऋतुजा नाटे

सौ. ऋतुजा नाटे (आई), ठाणे

१. निरागस आणि निर्मळ

‘काही वेळा मैथिली ऐकत नाही; म्हणून तिला ओरडावे लागते किंवा कधी तरी मारावेही लागते. त्या वेळी तिला मारले, तरी ती लगेच सगळे विसरून आमच्याशी प्रेमाने बोलायला येते. काही मुलांना मारले किंवा ओरडले, तर ते लक्षात ठेवतात. तसे तिचे नाही. एकदा अभ्यासावरून मी तिला मारले होते. त्यानंतर लगेचच ती माझ्याशी प्रेमाने बोलायला आली. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘मी तुला एवढे मारते आणि ओरडते, तरी तू माझ्याशी प्रेमाने कशी काय वागते अन् बोलते ?’’ तेव्हा ती अतिशय निरागसपणे मला म्हणाली, ‘‘आई, तू मला सांग ना, मी कसे वागायला पाहिजे ? ‘कसे वागायचे ?’, ते मला समजतच नाही.’’ तिचे हे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी आले. मी तिला म्हणाले, ‘‘तू जशी आहेस, तशीच छान आहेस. असेच सर्वांशी प्रेमाने वागायचे.’’

२. आम्हा पती-पत्नीत भांडणे झाली, तर मैथिली आम्हा दोघांना समजावून सांगते.

३. भाव

१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरुदेवांच्या वाढदिवसानिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रम होता. त्या दिवशी घरातील सिद्धता करतांना मैथिली पुष्कळ आनंदी होती. ‘गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणते कपडे घालायचे ?’, हे तिने आदल्या रात्री ठरवले होते. ‘मला राधेसारखे सजव’, असे तिने मला सांगितले. सोहळ्याच्या दिवशी तिने प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रासाठी स्वतःहून हार बनवला. त्यानंतर तिने उत्साहाने सिद्धता केली. तिच्याकडे पाहून ‘जणूकाही हा सोहळा आपल्या घरातच होणार आहे’, असे वाटत होते. त्यानंतर मी तिला नवीन कपडे घालून राधेप्रमाणे सजवले. तेव्हा ती खरोखरच श्रीकृष्णाची राधा दिसत होती. तिच्या तोंडवळ्यावरील तेज नेहमीपेक्षा वाढले होते. तिने संपूर्ण सोहळा पाहिला.

४. आई रडत असतांना ‘आपल्या समवेत परात्पर गुरु डॉ. आठवले असल्याने तू रडू नकोस’, असे तिला प्रेमाने समजावणारी मैथिली !

काही दिवसांपूर्वी मला थोडा मानसिक त्रास झाला. त्यामुळे मी पुष्कळ रडत होते. मैथिलीला त्याचे वाईट वाटत होते. ती सातत्याने मला विचारत होती, ‘‘आई, काय झाले ?’’; मात्र मी तिला काही सांगू शकत नव्हते. रात्री मी परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र हातात घेऊन त्यांना आत्मनिवेदन करत होते. त्या वेळीही मला फार रडू येत होते. तेव्हा मैथिली माझ्याजवळ आली आणि मला समजावत म्हणाली, ‘‘आई, तू रडू नकोस. आपल्या समवेत परम पूज्य आहेत. त्यानंतर तिने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ काढला आणि मला त्यातील एकेक पान उलटून दाखवू लागली. ती मला म्हणाली, ‘‘आपल्या समवेत परम पूज्यही आहेत आणि देवीदेवताही आहेत. मग तू का रडतेस ?’’ ‘परम पूज्य आपल्यासाठी काय काय करतात ?’, हे तिला जसे समजले, तसे त्या ग्रंथातील छायाचित्रे दाखवून ती मला समजावून सांगत होती. तिचे मन फार निर्मळ आहे.’

स्वभावदोष : हट्टीपणा – श्री. स्वप्नील सुरेंद्र नाटे, सौ. ऋतुजा नाटे, ठाणे.

सौ. उर्मिला खानविलकर (वय ६४ वर्षे, आजी (आईची आई)), मुंबई

सौ. उर्मिला खानविलकर

१. भाव

‘मैथिली जयतीला (धाकट्या बहिणीला) नेहमीच देवीच्या रूपात बघते.

२. अनुभूती

२ अ. मैथिलीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. मैथिलीच्या सहवासात माझा उत्साह वाढतो.

२. मैथिलीने निवडलेला कढीपत्ता एक मासानंतरही ताजातवाना राहिला होता.

२ आ. मैथिलीला आलेली अनुभूती : मैथिली सेवाकेंद्रात ४ – ५ दिवस रहायला आली होती. रात्री झोपल्यावर ती आकाशाकडे बघून मला म्हणाली, ‘‘या ढगावर २ देवी बसल्या असून त्यांतील एका देवीने लाल रंगाची आणि दुसर्‍या देवीने पांढर्‍या रंगाची साडी नेसली आहे. त्या देवी सेवाकेंद्राकडे आल्या असून सेवाकेंद्राभोवती फेर्‍या मारत आहेत.’’

(२६.५.२०२०)