ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)

जिज्ञासू, प्रेमळ आणि भावावस्थेत रहाण्याचा प्रयत्न करणारी रामनाथी आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला अमित औंधकर (वय १४ वर्षे) !

‘कु. अपाला अमित औंधकर (वय १४ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे १.११.२०२१ या दिवशी घोषित झाले. त्यानिमित्ताने तिची मावशी सौ. अक्षता रूपेश रेडकर आणि मावशीचे यजमान श्री. रूपेश रेडकर यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् तिच्यासंदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. अपाला औंधकर

सौ. अक्षता रूपेश रेडकर (कु. अपालाची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. अपालाचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. तिच्या लिखाणात कुठेही खाडाखोड नसते.

२. शिकण्याची वृत्ती

अपाला जे शिकते, ते परिपूर्ण शिकण्याचा प्रयत्न करते. ती मराठी आणि इंग्रजी या भाषांत टंकलेखन करायला शिकली. ती स्वतःला शिकायला मिळालेली सूत्रे त्वरित टंकलेखन करून ठेवते. टंकलेखन करतांना तिचा भाषाशुद्धी करण्याचा प्रयत्न असतो.

३. प्रेमभाव

‘आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते’, असे आपण म्हणतो किंवा ऐकतो; पण अपाला माझ्यापेक्षा वयाने पुष्कळ लहान असूनही लहानपणापासून तिनेच मला पुष्कळ प्रेम दिले आहे. मी ते शब्दांत सांगू शकणार नाही. ती मोठी होत गेली, तरी तिचे प्रेम कधीच न्यून झाले नाही.

४. तत्त्वनिष्ठ

ती वेळोवेळी मला माझ्यातील स्वभावदोषांची जाणीव करून देते. तिने काही सूत्रे सांगितल्यावर ती सूत्रे माझ्या अंतर्मनापर्यंत पोचतात आणि मला तिचे बोलणे ऐकावेसे वाटते. तिच्यामुळेच आमच्या दोघींचे कौटुंबिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर जिव्हाळ्याचे नाते बनले आहे.

५. सात्त्विकतेची ओढ

आता तिची कपडे आणि अलंकार यांची निवडही सात्त्विक झाली आहे.

६. भाव

६ अ. नृत्याचा सराव करण्यापूर्वी भावप्रयोग करणे : ती प्रत्येक वेळी नृत्याचा सराव करण्यापूर्वी भावप्रयोग करते. त्यामुळे ‘तिचा नृत्याचा सराव आध्यात्मिक स्तरावर होऊन तिचे नृत्य भावपूर्ण होऊ लागले आहे’, असे मला वाटते. ‘मीही प्रत्येक रुग्णावर उपचार (फिजिओथेरेपी) करण्यापूर्वी भावप्रयोग किंवा भाव ठेवून सेवा केल्यास मलाही सेवेतून आनंद मिळेल’, हे तिच्याकडून मला शिकायला मिळाले.

६ आ. अपालाने गायलेली भक्तीगीते ऐकतांना भावजागृती होणे : अपालाने गायनाच्या ३ परीक्षा दिल्या आहेत; पण तिचा गायनाचा विशेष सराव नाही. ती भावगीते आणि भक्तीगीते गातांना ‘ऐकत रहावे’, असे वाटते. अन्य गायकाने गायलेले एखादे भक्तीगीत ऐकतांना काहीच वाटत नाही; पण तेच गाणे अपाला गाते, तेव्हा त्या गीतामधील भावार्थ माझ्या लक्षात येऊन माझी भावजागृती होण्यास साहाय्य होते. मी कधी कधी भावजागृतीसाठी तिने गायलेली काही भक्तीगीते ऐकते.

६ इ. अपाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना ‘सगुण माता’ आणि श्री भवानीदेवीला ‘निर्गुण माता’ म्हणते. तसा तिचा भाव आहे.
अपालामध्ये ‘व्यासपिठावर बोलण्याचे धाडस, एकपाठी असणे, शिकण्याची वृत्ती, नेतृत्वगुण, बौद्धिक प्रगल्भता, तळमळ, सर्वांशी जवळीक साधणे, गुरुदेवांच्या प्रती अपार श्रद्धा, भाव’, आदी गुण आहेत.

श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर (कु. अपालाच्या मावशीचे पती), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. इतरांना आपलेसे करणे

‘अपाला वागण्या-बोलण्यातून इतरांचे मन जिंकते. माझी ६९ वर्षांची आई (श्रीमती उर्मिला रेडकर, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि कु. अपाला यांचे ३ – ४ वेळाच बोलणे झाले असेल; पण आई तिची अनेक वेळा कौतुकाने आठवण काढते.

२. जिज्ञासा

अपालामध्ये तीव्र जिज्ञासा असल्याने ‘सूक्ष्मातील स्पंदने जाणणे, देवतांची तत्त्वे अनुभवणे आणि सेवेतील नवीन भाग शिकणे’, यांची तिला ओढ असते. त्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते.

३. प्रयोगशील

भाववृद्धीसाठी प्रयोग करणे, सूक्ष्म-प्रयोग किंवा नृत्यातील विविध मुद्रा केल्यावर येणार्‍या अनुभूती, यांचा अभ्यास करतांना ती सतत वेगवेगळे प्रयोग करते.

४. अपालाच्या संदर्भात आलेली अनुभूती

३१.१०.२०२१ या दिवशी माझे भ्रमणभाषवर कु. अपालाशी बोलणे झाले. त्या वेळी मला आनंद होऊन ‘तिचे बोलणे सतत ऐकत रहावे’, असे वाटत होते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १.११.२०२१)


सतत ईश्वरी अनुसंधानात आणि शिकण्याच्या स्थितीत असलेली अन् प्रगल्भ बुद्धीमत्तेची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील दैवी बालके !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील दैवी बालकांमध्ये शिकण्याची विशेष वृत्ती आहे’, असे मला जाणवले. मला त्यांच्याशी संबंधित जाणवलेली काही विशेष सूत्रे येथे दिली आहेत.

पू. तनुजा ठाकूर

१. शिकण्याची वृत्ती

१ अ. सजीव अणि निर्जीव दोन्हींकडून शिकणे : बहुतेक दैवी बालकांची सजीव आणि निर्जीव या दोन्हींकडून शिकण्याची प्रवृत्ती असते. ‘ते सतत ईश्वराच्या अनुसंधानात असतात; म्हणूनच त्यांना प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळते’, असे माझ्या लक्षात आले.

१ अ १. सूक्ष्म ज्ञानेंद्रिये जागृत असल्यामुळे निर्जीव वस्तूंकडूनही सहजतेने शिकणे : गेल्या जन्मीच्या साधनेमुळे त्यांची सूक्ष्म ज्ञानेंद्रिये जागृत असतात. ती सतत अनुसंधानात राहिल्यामुळे निर्जीव वस्तूंशीही सहजतेने संवाद साधू शकतात. असे एकाच नाही, तर जवळपास सर्वच दैवी बालकांमध्ये मला अनुभवता आले आहे, उदा. एकाने त्याला ‘पंख्याकडून काय शिकायला मिळाले ?’, हे सांगितले, तर एकाने त्याला ‘नळाकडून काय शिकायला मिळाले ?’, हे सांगितले.

१ आ. हिंदी भाषा येत नसूनही त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणारे आणि एका मासातच ती भाषा आत्मसात करून सत्संगात हिंदी भाषेत व्यवस्थित बोलू लागलेले दैवी बालक ! : सत्संगात उपस्थित असलेल्या बहुतांश दैवी बालकांची मातृभाषा हिंदी नाही; पण त्यांना हिंदी भाषेतील सत्संगात बोलायला सांगितल्यावर त्यांनी ‘मला हिंदी येत नाही’, असे न सांगता हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला आणि एका मासातच त्यांनी आपले विचार हिंदी भाषेत अतिशय चांगल्या पद्धतीने मांडायला आरंभ केला. ही अतिशय असामान्य गोष्ट आहे. दोन दैवी बालके दक्षिण भारतातील आहेत; परंतु तेही लवकर हिंदीत बोलायला शिकले.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आज्ञापालन करून नामजपादी उपाय शोधायला शिकून लगेचच ते कृतीत आणणारा दैवी बालक ! : दैवी बालक केवळ स्थुलातील गोष्टीच नाहीत, तर सूक्ष्मातील गोष्टीही लवकर शिकून त्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करतात.
एके दिवशी प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले) दैवी बालकांना निरोप पाठवला, ‘‘आता तुम्हा सर्वांना आध्यात्मिक उपाय करायला शिकायचे आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागतील.’’ त्याच दिवशी रात्री एका दैवी बालकाच्या आईला आध्यात्मिक त्रास होत होता. त्याने आईच्या त्रासाचे सूक्ष्म परीक्षण करून योग्य नामजप आणि न्यास शोधून आपल्या आईवर नामजपादी उपाय केले. त्यामुळे ‘त्याच्या आईचा त्रास न्यून झाला’, असे त्याने सांगितले.

१ ई. दैवी बालकांनी गुरुकृपायोगांतर्गत साधनेच्या अष्टांग साधनेविषयी सहजतेने शिकून ते कृतीतही आणणे : दैवी बालक ग्रंथवाचन, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन किंवा ‘परात्पर गुरुदेवांचे तेजस्वी विचार’ नुसते वाचत नाहीत; तर त्वरित कृतीत आणतात. ते केवळ ग्रंथ किंवा दैनिक वाचन करत नाहीत, तर ते आचरणात आणतात. यालाच खर्‍या अर्थाने ‘शिकणे’ असे म्हणतात.

२. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये जागृत असणारी दैवी बालके !

सत्संग ऐकतांना आणि ऐकलेली सूत्रे लिहितांनाही त्यांची सूक्ष्म पंचज्ञानेंद्रिये अन् कर्मेंद्रिये जागृत रहातात. त्यामुळे ती स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही गोष्टी शिकू शकतात. यावरून ‘ती अष्टावधानी आहेत’, हे लक्षात येते.

३. दैवी बालकांमध्ये जाणवलेली प्रगल्भता !

दैवी बालके केवळ ८ – १० वर्षांची असूनही त्यांच्यामध्ये शिकण्याची वृत्ती पुष्कळ आहे. सत्संगात संत किंवा साधक जे काही सांगतात, ते दैवी बालके लगेचच त्यांच्या वहीत लिहून घेण्याचा प्रयत्न करतात. या दैवी बालकांपैकी एक बालिका कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) हिची लेखनशैली इतकी परिपूर्ण आहे की, प्रौढ व्यक्तीही तसे लिहू शकत नाही. ती चार रकाने करून लिहिते. पहिल्या रकान्यात साधकाचे नाव, दुसर्‍या रकान्यात त्यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र, तिसर्‍या रकान्यात संतांनी त्या साधकाला दिलेला दृष्टीकोन आणि चौथ्या रकान्यात काही विशेष सूत्र असेल, तर ते लिहिलेले असते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी असे लिहिणे, यातून ‘तिची बौद्धिक क्षमता किती प्रगल्भ आहे ?’, हे दिसून येते. काही दैवी बालके अगदी लहान असल्याने त्यांना नीट लिहिता येत नाही, तरीही ती त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे लिहिण्याचा प्रयत्न करतात.

४. अहं अत्यल्प असणे

त्यांच्यातील शिकण्याची वृत्ती हेच दर्शवते की, त्यांच्यात अहंकार फारच अल्प आहे. अहंकारी व्यक्तीला शिकण्यापेक्षा शिकवण्यात अधिक रस असतो. दैवी बालके त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे अत्यंत विनम्रपणे आणि कर्तेपण न घेता सांगतात. त्यांचे विचार ऐकून प.पू. गुरुदेव डॉ. आठवले दैवी बालकांची स्तुती करतात, तेव्हा ती बालके अगदी सहजतेने त्याचे कर्तेपण परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतात.

५. दैवी बालकांच्या केवळ बोलण्याने दैवी वातावरण निर्माण होणे

दैवी बालके कोणतीही शिकायला मिळालेली घटना सांगतात, तेव्हा त्यांचे ते बोलणे ऐकून भाव जागृत होतो. मन एकाग्र होते किंवा कधी कधी ध्यान लागते. त्यांच्याशी संवाद साधतांना वातावरण चैतन्यमय होऊन जाते आणि विविध प्रकारचे दिव्य सुगंध येतात.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (३०.१०.२०२१)