परळी (जिल्हा बीड) येथील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची  देवस्थानच्या सचिवांना पत्राद्वारे धमकी !  

असुरक्षित महाराष्ट्र ! – संपादक

परळी येथील वैद्यनाथ मंदिर

बीड – बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर ‘आरडीएक्स्’ स्फोटकांद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘वैद्यनाथ मंदिर संस्थानकडे पुष्कळ पैसे आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा ‘आरडीएक्स्’ने मंदिर उडवून देऊ’, असे धमकी देणारे पत्र मुख्य विश्‍वस्तांच्या नावे आले आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान संस्थानचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. मंदिर परिसराची पडताळणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.