नवी देहली – देशात कोरोना रुग्णांची संख्या अल्प होत असल्याने रेल्वे विभागाने फलाटाच्या (‘प्लॅटफॉर्म’च्या) तिकिटाच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली होती. हे तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले होते; मात्र आता पुन्हा एकदा ते ५० रुपयांवरून १० रुपये करण्यात आले आहे. कोरोना काळात प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी वाढू नये, यासाठी तिकिटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
#IndianRailways rolled back the #PlatformTicket prices that were increased during the #COVID19 pandemic time.https://t.co/H4ank115nj
— Zee Business (@ZeeBusiness) November 26, 2021