संभाजीनगर, जालना, नांदेडसह राज्यात एन्.सी.बी.च्या धाडी !

अमली पदार्थांच्या दलदलीत बुडलेल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी तिला धर्माचरणीच करायला हवे ! – संपादक

नांदेड – अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (‘एन्.सी.बी.’ने) २२ नोव्हेंबर या दिवशी संभाजीनगर, जालना आणि नांदेड यांसह राज्यातील काही जिल्ह्यांत अमली पदार्थ ‘रॅकेट’च्या विरोधात धाडी टाकल्या आहेत, असे वृत्त ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेने दिले आहे. नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील एका व्यापारी संकुलातून १ क्विंटल वजनाची अफूची बोंडे जप्त केली आहेत.

‘क्रूझ ड्रग्ज’ प्रकरणातील कारवाईनंतर एन्.सी.बी. सक्रीय झाली आहे. अमली पदार्थांच्या परराज्यातून होणार्‍या तस्करीचे जाळे मुख्यत: संभाजीनगर, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांतून राज्यभरात पसरले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एन्.सी.बी.’ने  केलेल्या या कारवाईला महत्त्व आहे. नांदेड जिल्ह्यातील मांजरम (तालुका नायगाव) येथे पथकाने १५ नोव्हेंबर या दिवशी पाठलाग करून ११ कोटी रुपयांचा गांजा पकडला होता. या वेळी २ जणांना अटक करण्यात आली होती. या जिल्ह्यांत ‘एन्.सी.बी.’चे पथक तळ ठोकून असून ठिकठिकाणी कसून चौकशी करत आहे.