श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

मृत्यूनंतर सूक्ष्म जगातील प्रवास विनाअडथळा व्हावा आणि मनुष्यजन्माचा खरा लाभ करून घेता यावा, यांसाठी मनुष्यदेहाला अंतर्बाह्य साधनेच्या शिकवणीने संस्कारित करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘अनेक जन्मांनंतर मनुष्यजन्म लाभतो आणि ‘अनेक जन्म केलेल्या साधनेचे फळ’ म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांसारखे ‘गुरु’ त्या मनुष्यजिवाच्या जीवनात येतात. मनुष्याचे आयुष्य पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना याची सतत जाणीव करून देतात आणि मनुष्याच्या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी ते साधकांना साधना शिकवतात. जोपर्यंत आपण मनुष्यदेहामध्ये आहोत, तोपर्यंतच साधना शिकण्याची सर्वाेत्तम संधी साधकांना आहे. मृत्यूनंतरचे सर्व जग ‘सूक्ष्म’ आहे. त्या सूक्ष्म जगातील प्रवास विनाअडथळा होण्यासाठी आणि मनुष्यजन्माचा खरा लाभ करून घेण्यासाठी मनुष्यदेहाला अंतर्बाह्य साधनेच्या शिकवणीने संस्कारित करणे अत्यंत आवश्यक तर आहेच; पण आता ही काळाची आवश्यकता आहे. ‘मनुष्यजन्म केवळ साधना करण्यासाठीच ईश्वराने मला दिला आहे’, अशी ठाम श्रद्धा प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (८.५.२०२०)