श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. ‘आयुष्याच्या या साधना प्रवासात जेथे देव मिळतो, तेथे अजून काही मिळवण्याची आशा-आकांक्षा रहात नाही. देवाचे विश्व पुष्कळ सुंदर आणि अद्भुत् आहे. त्यात रमले की, कशाचीच आठवण येत नाही.

२. भावजागृतीचे प्रयत्न केल्यास तुम्हाला देवाच्या विश्वात रमता येते. देवाचे विश्व तुम्हाला शाश्वत आनंद देते.

३. अध्यात्म सुंदर आहे. ते जगणे आणि अनुभवणे, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेणे !

४. अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे. अध्यात्मात शिकू तेवढे अल्प आहे. शिकण्यासाठी अनेक जन्मही अपुरे पडतील. त्यामुळे अध्यात्माचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा त्यामधील तत्त्व ओळखून त्यामागील शास्त्र जाणून घ्यायला हवे.

५. अध्यात्मात जे शिकलो, ते लगेच कृतीत आणणे, हेच ‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ आहे ! ईश्वराप्रती असलेल्या भावानेच अध्यात्मशास्त्र जाणता येते.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१.५.२०२०)