‘सूर्यवंशी’ चित्रपटात खलनायकाचे पात्र मुसलमान दाखवल्याचे प्रकरण
गुन्हेगारीत अल्पसंख्यांकांचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे नेहमीच दिसून येते. जिहादी आतंकवादी कोण आहेत ?, हे सर्व जगाला ठाऊक आहे, असे असतांना अशांना खलनायक दाखवले, तर कुणाच्या पोटात का दुखते ? – संपादक
नवी देहली – चित्रपटगृहे उघडण्याची अनुमती दिल्यानंतर ‘सूर्यवंशी’ हा हिंदी नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यातील खलनायकाचे पात्र मुसलमान दाखवल्यावरून वाद निर्माण करण्यात येत आहे. याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना विचारण्यात आले असता त्यांनी, ‘माझ्या यापूर्वीच्या ३ चित्रपटांमध्ये हिंदु व्यक्तीला खलनायक दाखवण्यात आले होते, तेव्हा कुणी याविषयी प्रश्न का विचारला नाही ?’, असा प्रतिप्रश्न विचारला.
Quint journalist complains about negative Muslim character in Sooryavanshi, Rohit Shetty gives extra befitting replyhttps://t.co/LBp6Sreil9
— OpIndia.com (@OpIndia_com) November 14, 2021
रोहित शेट्टी पुढे म्हणाले की, काही वृत्तपत्रांमध्ये ‘सूर्यवंशी’ चित्रपटात चांगले मुसलमान आणि वाईट मुसलमान अशी कथा दाखवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र ते पूर्णपणे चुकीचे आहे. चित्रपट सिद्ध करतांना आम्ही असा काही विचारच करत नाही; मग लोक असा विचार का करतात ? एखाद्या वाईट किंवा चांगल्या व्यक्तीचा त्याच्या जातीशी संबध लावला जाऊ नयेे.