फेब्रुवारी २००९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ त्रास होऊ लागला. त्यानंतर ३.४.२००९ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या कालावधीत साधिकेला आलेल्या त्रासदायक अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पुण्याहून रामनाथी आश्रमात येत असतांना
१ अ. चिडचिड होणे : ‘२९.३.२००९ या दिवशी पुण्याहून रामनाथी आश्रमात येत असतांना माझी पुष्कळ चिडचिड झाली. रेल्वेस्थानकावर पुष्कळ वेळ थांबून रहावे लागल्यामुळे मला त्रास झाला.
१ आ. मी रेल्वेने प्रवास करत असतांना काहीच कारण नसतांना माझ्या हातातील बांगड्या वाढल्या (फुटल्या).
१ इ. अनुसंधान साधण्यासाठी प्रयत्न करावे लागणे : मी घरून निघण्याच्या आदल्या दिवसापर्यंत माझ्याकडून होणार्या भावपूर्ण प्रार्थना एकदम बंद झाल्या. मला प्रयत्नपूर्वक प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप करावा लागत होता. माझ्याकडून आत्मनिवेदन झालेच नाही. एरव्ही माझे देवाशी सतत अनुसंधान असते. आता माझी तशी स्थिती नव्हती.
२. रामनाथी आश्रमात आल्यानंतर झालेली शारीरिक आणि मानसिक स्थिती
२ अ. ३०.३.२००९ या दिवशी रामनाथी आश्रमात आल्यावर माझ्या शारीरिक त्रासांत वाढ झाली. माझे संपूर्ण शरीर दुखत होते.
२ आ. मनाची स्थिती नकारात्मक होणे : आश्रमात आल्यापासून मी आजपर्यंत कधीही न अनुभवलेली मनाची नकारात्मक स्थिती अनुभवली. मी आश्रमात येण्याची वर्षभर वाट पहात असते. त्या पार्श्वभूमीवर ‘मी उगीच आश्रमात आले. मी आश्रमात आले नसते, तर बरे झाले असते’, असे विचार माझ्या मनात चालू झाले.
२ इ. मला सतत झोप येत होती. मी नामजपादी उपाय केले, तरीही मला येणार्या झोपेचे प्रमाण न्यून होत नव्हते.
२ ई. प्रयत्नपूर्वक प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप करावा लागणे : मी घरी असतांना होणारा भावपूर्ण नामजप मी परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत बसूनही होत नव्हता. मी घरी असतांना मानसरित्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत जाऊन तेथे बसून नामजप करते. तेव्हा माझा नामजप पुष्कळ भावपूर्ण होतो. नामजप करतांना बर्याचदा माझे आत्मनिवेदन चालू होते. आश्रमात आल्यापासून माझ्या मनात अनावश्यक विचारांचे प्रमाण पुष्कळ वाढले. पूर्वी दिवसभरात सहजपणे होणार्या प्रार्थना आणि कृतज्ञता मला पुष्कळ प्रयत्नपूर्वक कराव्या लागत होत्या. शेवटी मी माझ्याकडून नेहमी सहजपणे होणार्या प्रार्थना लिहिल्या आणि त्या वाचायला आरंभ केला. मी नामजपही मोठ्याने करायला आरंभ केला.
२ उ. अंगदुखीमुळे झोपून रहावे लागणे आणि दिवसभर मरगळ जाणवून शारीरिक त्रास होणे : ४.३.२००९ या दिवशी मी नेहमीप्रमाणे लवकर उठले. नंतर सकाळी ७ वाजेपर्यंत वैयक्तिक आवरून झाल्यावर अंगदुखीमुळे मी खोलीतच बसून नामजप करत होते. तेव्हा मला पुष्कळ झोप आल्याने मी झोपले. आरती चालू होण्यापूर्वी शंखनाद झाल्यावर मला जाग आली आणि मग मी आरतीसाठी खोलीतून बाहेर आले. आरती झाल्यावरही माझ्या स्थितीत सुधारणा झाली नाही. मला दिवसभर मरगळ जाणवून शारीरिक त्रास होत होते. ‘माझी घरी असणारी मनाची स्थिती खरी कि आश्रमात आल्यावर झालेली मनाची स्थिती खरी ?’, हेच माझ्या लक्षात येईनासे झाले.’
– सौ. भाग्यश्री नरसिंह लेले, तळेगाव दाभाडे, पुणे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |