‘जस्ट डायल’ संकेतस्थळावर मिळाली वेश्याव्यवसाय करणार्‍या १५० तरुणींच्या दराची माहिती !

देहली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची माहिती

देशात अशा प्रकारचे संकेतस्थळ चालू आहे, हे पोलिसांना कसे ठाऊक नाही ? कि त्यांनी याकडे आर्थिक लाभासाठी दुर्लक्ष केले आहे का ?, असे प्रश्‍न उपस्थित होतात. याची चौकशी झाली पाहिजे ! – संपादक

देहली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल

नवी देहली – देहली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना ‘जस्ट डायल’ या संकेतस्थळावर ‘स्पा मसाज’साठीची (मालिश करण्याचा एक प्रकार) माहिती मिळवायची होती. त्यामुळे त्यांनी या संकेतस्थळावर संदेश पाठवल्यावर त्यांना  वेश्याव्यवसाय करणार्‍या १५० हून अधिक तरुणींचे दर सांगण्यात आले, अशी माहिती स्वतः मालीवाल यांनी ट्वीट करून दिली.

मालिवाल म्हणाल्या की, मी ‘जस्ट डायल’ आणि देहली  पोलिसांची गुन्हे शाखा यांना या संदर्भात समन्स पाठवत करत आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘जस्ट डायल’ची भूमिका काय आहे ?, याची देहली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या नोटीशीत करण्यात आली आहे. मी शक्य ती कारवाई करीन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.