१. रामनाथी आश्रमात आल्यावर अंगावर दैवी कण आढळणे आणि ‘त्या कणांच्या माध्यमातून स्वतःवर चैतन्याचा वर्षाव होत आहे’, असे वाटणे
१.९.२०२१ या दिवशी मी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्यावर मला माझ्या अंगावर पुष्कळ दैवी कण दिसले. ‘मी आश्रमात आल्यामुळे मला दैवी कणांच्या माध्यमातून विपुल प्रमाणात चैतन्य मिळत आहे’, हे माझ्या लक्षात आले. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीजवळून गेल्यावर ‘त्यांच्या खोलीतून माझ्यावर पुष्कळ दैवी कणांचा वर्षाव होत आहे आणि मला चैतन्य मिळत आहे’, अशी मला जाणीव झाली.
(‘श्रीनिवास आश्रमात आल्यापासून त्याच्या अंगावर अनेक दैवी कण आढळून येत आहेत.’ – श्री. धैवत वाघमारे (श्रीनिवासचा मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)
२. नामजप करत असलेल्या संतांना पाहून ‘त्यांच्याकडून चैतन्ययुक्त लहरी येत आहेत’, अशी जाणीव होणे
आश्रमातील खोलीतून भोजनकक्षात जात असतांना मला तिसर्या माळ्यावर संत आणि साधक नामजपाला बसलेले दिसतात. तिकडे पाहिल्यावर प्रतिदिन ‘संतांकडून माझ्याकडे चैतन्ययुक्त लहरी येत आहेत’, असे मला जाणवते.
३. ‘फिल्टर’च्या काचेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती पाठीमागे येऊन उभी असल्याचे दिसणे; परंतु प्रत्यक्षात मागे कुणीही नसणे
५.९.२०२१ या रात्री मी ‘फिल्टर’मधून बाटलीत पाणी भरत असतांना मला ‘फिल्टर’च्या काचेमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणे पांढरा सदरा, पांढरा पायजमा, पांढरे केस आणि चष्मा लावलेली व्यक्ती दिसली. ‘ती व्यक्ती चालत येऊन माझ्यामागे ३ – ४ फूट अंतरावर उभी राहिली’, असे मला जाणवले. मी मागे वळून बघितले, तर तिथे कुणीच नव्हते. तेव्हा मला वाटले, ‘मी आश्रमात आल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांना कळल्यामुळे ते सूक्ष्मातून मला बघायला आले आहेत.’
४. खोलीत जातांना ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत येत आहेत’, अशी जाणीव होणे
मी बाटलीत पाणी भरून खोलीत नेत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत खोलीत येत आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘त्यांच्या आगमनासाठी खोलीची सिद्धता कर’, असे आईला सांगावे’, असे मला वाटले.
५. सेवा करत असतांना परात्पर गुरु डॉक्टर खोलीत जात असल्याचे दिसल्यावर ‘ते रुग्णाईत असल्याने बाहेर कसे येतील ?’, असे वाटणे, तेव्हा ‘त्यांच्या सूक्ष्म रूपाचे दर्शन झाले असेल’, असे मामाने सांगणे
६.९.२०२१ या दिवशी सकाळी मी सेवा करत असतांना मला पांढरी बंडी आणि पांढरा पायजमा घातलेले अन् मुखपट्टी (मास्क) लावलेले परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या खोलीचे दार उघडून ते आत जातांना दिसले. तेव्हा मला प्रश्न पडला, ‘परात्पर गुरु डॉक्टर रुग्णाईत आहेत, तर ते खोलीतून बाहेर कसे येतील ? मग मला दिसलेली व्यक्ती कोण होती ?’ तेव्हा मामा (श्री. धैवत वाघमारे) मला म्हणाला, ‘‘ते खोलीच्या बाहेर येत नाहीत. तुला परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून दर्शन झाले असेल.’’
६. ‘नेहमी आश्रमातच रहावे’, अशी तीव्र इच्छा होणे आणि त्यासाठी ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच बळ देतील’, असे वाटणे
या वेळी मी आश्रमात रहायला आल्यानंतर माझ्या मनात ‘मी आता आश्रमातच रहायला हवे. आश्रमातून घरी परत जायला नको’, असे विचार आले. ‘मला पूर्ण वेळ साधनाच करायची आहे’, असे मला वाटते. ‘मी आश्रमात मला सांगतील तेवढा नामजप आणि सांगतील ती सेवा आनंदाने करीन. परात्पर गुरु डॉक्टरच मला त्यासाठी बळ पुरवतील’, असे मला सातत्याने वाटते.’
– कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), (वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |