काँग्रेसच्या घटनेत पालट करण्यात येणार

  • मद्यपान करण्याची सवलत मिळण्याची शक्यता !

  • मद्यपान केल्याची ६० टक्के पदाधिकार्‍यांची स्वीकृती

  • इतकी वर्षे मद्यपान न करण्याची अट किती काँग्रेसवाले पाळत होते ? हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगायला हवे ! – संपादक 
  • मोहनदास गांधी यांचे नाव घेऊन मते मागणारे काँग्रेसवाले गांधींच्याच अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या घटनेमधील अटीचे सर्रास उल्लंघन करत होते आणि करत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक 
काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक

नवी देहली – १०० वर्षांपूर्वी मोहनदास गांधी यांच्या पक्षाच्या अध्यक्षतेखाली पक्षाची घटना लिहिण्यात आली होती. आता त्यात पालट करण्यात येणार आहे. यात ‘मद्यपान न करणे’ आणि ‘खादी विणण्याची अनिवार्यता’, या नियमांत सवलत दिली जाऊ शकते. त्याच वेळी सार्वजनिक व्यासपिठावर विधाने करू नयेत, यासाठीचे नियम कडक केले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. घटनेत पालट करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर मासात काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या एका बैठकीत घटनेतील सूत्रांवर ‘मनमोकळी’ चर्चा झाली. ‘मद्यपानापासून दूर रहावे’ या गोष्टींचे पालन करू शकलो नाही, असे बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांपैकी ६० टक्के पदाधिकार्‍यांनी मान्य केले.