शेतकर्‍यांशी बोलण्याऐवजी त्यांचे ऐकून घेणे अधिक महत्त्वाचे !  

भाजपचे खासदार वरुण गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

भाजपचे खासदार वरुण गांधी

लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) – शेतकर्‍यांना होणारा त्रास जाणून घेण्यासाठी बोलण्याची नाही, तर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी मी सरकारसमोर रडणार नाही, तर कायदेशीर कारवाई करणार आहे, अशा शब्दांत उत्तरप्रदेशातील पिलीभित मतदारसंघातील भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी स्वपक्षाच्या केंद्रातील सरकारवर टीका केली आहे. ‘शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. ज्या तुलनेत शेतकर्‍यांनी पिकांच्या उत्पादनासाठी खर्च केला आहे, त्या तुलनेत त्यांचे धान्य खरेदी केले जात आहे नाही आणि ऊसालाही योग्य भाव दिला जात नाही’, असेही वरुण गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे.