मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रथमदर्शनी माहिती अहवाल प्रविष्ट करण्यापूर्वी त्यांना तीन दिवस अगोदर नोटीस देण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तसेच त्यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असेही आदेशात न्यायालयाने म्हटले आहे. वानखेडे यांच्या अधिवक्त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.