उत्तरप्रदेशात पाक क्रिकेट संघाचा विजय साजरा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा होणार नोंद !

अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकने भारताचा पराभव केल्यानंतर भारतात विविध ठिकाणी धर्मांधांकडून विजय साजरा करण्यात आला. उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे.
यूपी के अलग-अलग जिलों में पाकिस्तान के समर्थन में आए लोगों के खिलाफ केस दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया गया है. #UttarPradesh #INDvPAK | @abhishek6164 https://t.co/en916xpuyH

आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. आगरा येथे विजय साजरा करणार्‍या ३ काश्मिरी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद होणार !