गुरुसेवेची तळमळ आणि चुकांप्रती गांभीर्य असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या धाराशिव येथील साधिका सौ. साधना लेणेकर (वय ५२ वर्षे) !

धाराशिव येथील सनातनच्या साधिका सौ. साधना लेणेकर यांनी ५.६.२०२० या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. सोलापूर येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. साधना लेणेकर

श्री. मिनेश पुजारे

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या वेळी मी काकूंच्या समवेत सेवा करत होतो. आम्हाला दिवसभर दुचाकी गाडीवरून सेवेला जावे लागायचे. त्या वेळी काकूंना शारीरिक त्रास व्हायचा, तरी त्या स्थिर राहून सेवा करायच्या. आम्ही वेगवेगळ्या भागांत जाऊन प्रसार करायचो. थोडा वेळ मिळाल्यास त्या शांतपणे नामजपासाठी प्रयत्न करून मलाही करायला सांगायच्या.’

सौ. सोनाली कोठावळे

१. सेवेची तळमळ

‘काकू प्रत्येक सेवा विचारून आणि सेवेची व्याप्ती समजून घेऊन करतात. त्यांच्या सेवेशी संबंधित अशा संगणकीय सेवा त्या स्वतःच करतात. काही अडचण आली, तर काकू त्यावर उपाययोजनाही काढतात.’

२. प्रेमभाव

‘पूर्वी काकूंना साधकांविषयी प्रतिक्रिया यायच्या. आता ‘साधक गुरुदेवांची मुले आहेत’, असा त्यांचा भाव असतो. साधक प्रतिक्रियात्मक बोलले, तरी त्यांना त्यांच्याविषयी प्रेम वाटते.’

३. प्रांजळपणे चूक सांगणे

‘सेवेत काही चुका झाल्यास त्या लगेच प्रांजळपणे सांगतात. त्या स्वतःच्या चुकांविषयी इतरांना विचारतात आणि ‘मला साहाय्य करा’, असे सांगतात.’ (२४.१.२०२०)

कु. दीपाली मतकर

६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. ‘सौ. साधना लेणेकरकाकू सतत उत्साही आणि आनंदी असतात.

२. सेवेची तळमळ

अ. काकू रहातात, त्या ठिकाणी साधकांची संख्या अल्प आहे, तसेच साधकांचा सेवेला वेळ देण्याचा भागही अल्प आहे. त्यामुळे काकू अनेक सेवा स्वतःच करतात. त्या ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्याचे नियोजन करणे, जाहीर प्रवचने घेणे, प्रसार करणे आणि नियतकालिकांचे नूतनीकरण करणे, या सर्व सेवा करतात. अन्य कुणी सेवा केली नाही, तर त्या स्वतःच ती सेवा करतात.’

३. चुकांची खंत वाटून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे

‘पूर्वी काकूंची स्थिती पुष्कळ नकारात्मक असायची. ‘मी एकटीच सर्व सेवा कशी करू ?’, असे वाटून त्या त्याच स्थितीत रहायच्या. त्या वेळी त्यांचे बोलणे प्रतिक्रियात्मक आणि इतरांना दुखावेल, असे असायचे; पण या ६ मासांत त्यांनी स्वतःत पुष्कळ पालट केले. केंद्रात कोणतीही चूक झाली, तरी आता ती चूक त्यांना स्वतःची वाटते आणि ‘मी पुष्कळ अल्प पडले’, अशी खंत वाटते. चूक सुधारण्यासाठी त्यांची तळमळ असते.

४. स्वतःसमवेत ‘केंद्रातील साधकांचीही साधना व्हावी’, अशी लेणेकरकाकूंमधील तळमळ असणे

४ अ. साधक सत्संगाला यावेत, यासाठी लेणेकरकाकूंनी प्रयत्न करणे : पूर्वी केंद्रातील साधकांच्या नकारात्मक विचारांमुळे केंद्रात कोणत्याही सेवेचे नियोजन करता यायचे नाही. बर्‍याच जणांच्या अडचणी असायच्या; पण लेणेकरकाकूंना ‘आपल्या केंद्रात नियोजन व्हायला हवे’, असे वाटायचे. तेथील साधकांना सत्संगाला येण्यास अडचण असायची; पण काकू पुष्कळ तळमळीने सर्व साधक सत्संगाला यावेत, यासाठी प्रयत्न करायच्या. सत्संगात कोणतेही सूत्र सांगितल्यास काकू सकारात्मक असायच्या.

४ आ. लेणेकरकाकूंनी साधकांना सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि ‘गुरुदेवच मला शिकवणार आहेत’, असा त्यांचा भाव असणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभी ज्याप्रमाणे जाहीर प्रवचने घेतली, त्याप्रमाणे आपल्यालाही आता प्रत्येक केंद्रात अधिकाधिक प्रवचने घ्यायची आहेत’, असे काकूंना सांगितल्यावर त्यांनी लगेचच काही गावांची नावे सांगितली आणि ‘तिथे कधी संपर्काला जाणार’, हेही सांगितले. त्या सर्व साधकांना ‘सकारात्मक राहून सेवा करूया’, असे प्रोत्साहन देत होत्या. काकूंकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची सेवा, केंद्रातील प्रसारसेवा आणि अन्य अनेक सेवा असूनही त्यांनी ही नवीन सेवा करण्याची सिद्धता केली. ‘गुरुदेव मला शिकवणार आहेत आणि मला शिकायचेच आहे’, अशी त्यांची तळमळ होती.

५ इ. ‘भगवंत आणि गुरुदेव मला शिकवणार’, असा विचार करून उत्साहाने प्रसारसेवा करणार्‍या काकू ! : लातूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी काकू ८ दिवस रहाण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी घरोघरी जाऊन उत्साहाने प्रसारसेवा केली. ‘मला त्रास होत आहे’, असा विचार न करता ‘भगवंत आणि गुरुदेव मला शिकवणार’, असा त्यांचा विचार असायचा.’

(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२४.१.२०२०))