मुसळधार पावसामुळे नैनिताल (उत्तराखंड) येथे नाशिकमधील २७ यात्रेकरू अडकले !

उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथील पूरस्थिती

नाशिक – उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत. याचा फटका नैनितालमध्ये अडकलेल्या येथील २७ यात्रेकरूंना बसला आहे. यात्रेकरूंमध्ये येवला तालुक्यातील ४ शेतकरी, तर मालेगाव तालुक्यातील २३ यात्रेकरू यांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी येथील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा’च्या वतीने तेथील पोलीस प्रशासनाशी संपर्क करून यात्रेकरूंना एका उपाहारगृहात नेण्याची व्यवस्था केली आहे.