१. लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘समान नागरी कायदा’ करणे आवश्यक !
‘देशाला खर्या अर्थाने समृद्ध आणि विकसित करायचे असेल, तर एकच मार्ग आहे अन् तो म्हणजे ‘लोकसंख्या नियंत्रण.’ असे म्हणतात, ‘छोटा परिवार सुखी परिवार.’ आपल्या देशहितासाठी ‘समान नागरी कायदा’ करून लोकसंख्या नियंत्रण करता येईल. भारतीय स्वातंत्र्यानंतर हा कायदा न केल्याने हिंदूंचे धोरण ‘हम दो हमारे दो’, तर अल्पसंख्यांकांचे धोरण ‘हम पाच हमारे पच्चीस’, असे राहिले आहे. यामुळे भारतात पुष्कळ वस्ती निर्माण झाली आहे.
२. हिंदूंनी संघटित होऊन देशात ‘समान नागरी कायदा’ आणि ‘धर्मांतरविरोधी कायदा’ लागू करून घ्यायला हवा !
देशात समान नागरी कायदा लागू न केल्यास येत्या १० वर्षांत पाकिस्तानला मागे टाकणारा ‘महापाकिस्तान’ भारतात निर्माण होईल. हिंदु भ्याड, भेकड आणि नेभळट आहेत, तसेच त्यांच्यात स्वाभिमानाची कमतरता असून ते संघटित नसल्याने त्यांच्या आया-बहिणींचे धर्मांतर केले जात आहे. याला निवडून दिलेले लोकप्रतिनिधी उत्तरदायी आहेत. देशाला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन ‘समान नागरी कायदा’ आणि ‘धर्मांतरविरोधी कायदा’ शासनकर्त्यांकडून लागू करून घेतला पाहिजे.
३. मानवाने ईश्वराला मान्य होईल, असे न वागल्याने निसर्गदेवतेची अवकृपा ओढवली आहे. त्यामुळे देशावर आणि जगावर कोरोनारूपी महामारीचे संकट ओढवले आहे.’
– श्री. नाना उपाख्य विजय विष्णु वर्तक, नागोठणे, रायगड. (२२.८.२०२१)