विजयादशमीचे खरे माहात्म्य काय आहे ?

दशइंद्रिये म्हणजेच स्वभावदोष आणि अहं यांवर विजय प्राप्त करणे हेच विजयादशमीचे खरे माहात्म्य आहे. दसरा म्हणजेच दशहरा ! दशहरा म्हणजे साधना आणि इंद्रियनिग्रह करून स्वतःवर विजय मिळवणे होय ! काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर, स्वार्थ, अन्याय, क्रूरता आणि अहंकार या दहा रिपूंवरही विजय मिळवायला हवा. यासाठीच धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), तसेच ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्तीदेवतांचे स्मरण दसर्‍याच्या शुभदिनी केले जाते.

हे दशमहा विद्याशक्ती जगदंबे, आमच्यातील आत्मस्वरूपाची ओळख होऊन आमच्याकडून साधना होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !