(म्हणे) ‘हे लोक म. गांधी यांच्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राष्ट्रपिता बनवतील !’ – असदुद्दीन ओवैसी यांची टीका

मुळात गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ अशी दिलेली पदवीच चुकीची आहे. हा देश सहस्रो वर्षांपासून ऋषी-मुनी, साधूसंत यांच्यामुळे विश्‍वगुरु राहिला आहे. त्यांच्यामुळेच भारताकडे अत्यंत प्रगत शास्त्रेही होती. तरीही त्यांना कुणी कधी ‘राष्ट्रपिता’ असे म्हटले नाही आणि त्यांनीही त्यांना कुणी असे म्हणावे, यासाठी तसा प्रयत्नही केला नाही. गांधी यांना अशा प्रकारची ओळख देण्याचे काम काँग्रेसींनी स्वार्थासाठी केले आहे. खर्‍या देशभक्तांना ते कदापि मान्य नाही. – संपादक

एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – हे लोक चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे असेच चालू राहिले, तर ते म. गांधी यांना काढून ज्या सावरकर यांच्यावर म. गांधी यांच्या हत्येचा आरोप होता आणि न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते, त्या सावरकर यांना ‘राष्ट्रपिता’ बनवतील, अशी टीका एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. (स्वातंत्र्यवीर सावरकर गांधी हत्येच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले असतांनाही त्यांना सातत्याने आरोपी ठरवून त्यांची अपकीर्ती करणार्‍यांवर आता गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक)