जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच मुद्रांक विक्रेते नागरिकांची लुबाडणूक करत असतांना जिल्हा प्रशासन झोपले आहे का ? त्यांना या गोष्टी ठाऊक असतांनाही ते मुद्रांक विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाहीत ? यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनाच निलंबित करून शिक्षा करा !

‘नागपूर येथे प्रतिवर्षी शाळा आणि महाविद्यालये येथील प्रवेश प्रक्रिया चालू झाल्यावर होणारा मुद्रांकाचा तुटवडा यंदाही निर्माण झाला असून या संधीचा अपलाभ घेत मुद्रांक विक्रेते अधिक दराने त्याची विक्री करत आहेत’, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. १०० रुपयांचा मुद्रांक ४००-५०० रुपयांना विकून नागरिकांची लुबाडणूक केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील तहसील कार्यालयातच मुद्रांक विक्री केली जाते. त्यासाठी विक्रेत्यांना परवाने देण्यात आले असून कोषागार कार्यालयाकडून त्यांना मुद्रांक पुरवठा केला जातो. कुणाला किती मुद्रांक दिले जाते ? याची नोंद केली जाते; मात्र विक्रेते ते निर्धारित दराने विकतात कि काळाबाजार करतात ? यावर देखरेख करणारी यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाही.’
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !