महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाची कारवाई
मुंबई – बनावट पारपत्र सिद्ध करून संयुक्त अरब अमिराती येथे जाणार्या एका बांगलादेशी नागरिकाला महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने देहली विमानतळावरून कह्यात घेतले आहे. इर्शाद शहाबुद्दीन शेख असे त्याचे नाव आहे. ३३ वर्षीय इर्शाद याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.