सातारा, २ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाल्यानंतर सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. बांधकामाच्या अनुषंगाने सल्लागार संस्थेच्या नेमणुकीसाठी ८ आस्थापनांनी निविदा भरल्या आहेत. हे सूत्र शासकीय स्तरावर प्रलंबित आहे. नंतर प्रत्यक्ष योजना आणि आराखडा सिद्ध करण्यास ३ मास कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.
सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची निविदाप्रक्रिया अनुमाने ४५० कोटी रुपयांची असणार आहे. यामध्ये इमारत बांधकाम, अंतर्गत सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, शल्यकर्म कक्ष, ‘लेक्चर हॉल’, मुला-मुलींसाठी आणि कर्मचारी वर्गासाठी निवासी वसतीगृह, आदी इमारतींचा समावेश असणार आहे. त्यामुळे तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाने निविदाप्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ करावा, अशी अपेक्षा आहे.