देवद आश्रमातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. महेंद्र राठोड

१. ‘दादा मितभाषी आणि नम्र आहेत. वयस्कर साधकांशी ते आदराने वागतात.

२. इतरांना साहाय्य करणे : दादा साधकांच्या सेवेतील अडचणी सोडवतात. दादा सेवा झाल्यानंतर सहसाधकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेतात आणि त्यातून मार्ग काढतात.

श्री. राजेंद्र सांभारे

३. उत्तम नियोजनकौशल्य आणि सेवेची तळमळ : दादा नोकरी करतात. ते त्यांच्या वेळेचे चांगले नियोजन करतात. त्यांना उपलब्ध असलेल्या अल्प वेळेत ते ‘स्वच्छतेची सेवा, स्वच्छतेसाठी लागणार्‍या साहित्याच्या वितरणाची सेवा, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा, बंब पेटवण्याची सेवा’ अशा विविध सेवा कौशल्याने करतात.

४. माझ्या समवेत सेवा करताना त्यांची एखादी चूक झाल्यास ते चूक प्रांजळपणे स्वीकारतात.’

– श्री. राजेंद्र सांभारे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१.२०२०)