धर्मांतरासाठी परदेशातून नाशिक येथील धर्मांधाच्या खात्यात २० कोटी रुपये जमा !

  • हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी राबवण्यात येत असलेले राष्ट्रव्यापी षड्यंत्र उघड !

  • विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेला धर्मांध हा नाशिकमध्ये हिंदु नाव धारण करून करत होता हिंदूंचे धर्मांतर !

धर्मांतराच्या विरोधात कडक कायदा करण्याची आवश्यकता असून केंद्र सरकारने या दिशेने तत्परतेने पावले उचलावीत, हीच धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा ! – संपादक 

‘धर्मांधांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्चशिक्षण दिल्यास ते आतंकवादाकडे वळणार नाहीत’, असा युक्तीवाद करणारे निधर्मी, साम्यवादी यांना आता काय म्हणायचे आहे ? – संपादक 

डॉ. आतिफ

नाशिक – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने धर्मांतराच्या प्रकरणात नाशिकच्या आनंदनगर भागातून डॉ. आतिफ याच्यासह मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील महंमद शरीफ कुरेशी आणि महंमद इदरीलला या तिघांना अटक केली आहे. आतिफ हा कुणाल चौधरी या नावाने नाशिकमध्ये रहात होता. त्याच्या खात्यात विविध देशांतून तब्बल २० कोटी रुपये जमा झाले असल्याचे समोर आले आहे.

धर्मांतराच्या प्रकरणात उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने ६४ वर्षीय मौलाना (इस्लामी अभ्यासक) कलीम सिद्दीकी याला गेल्या आठवड्यातच उत्तरप्रदेशच्या मेरठ येथून अटक केली आहे. मौलाना सिद्दीकी हा २ इस्लामी संघटनांचा अध्यक्ष आहे.

या प्रकरणात यापूर्वी मुफ्ती काझी आणि उमर गौतम या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही कलीम सिद्दीकी याच्या संपर्कात होते. ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतिफ हासुद्धा मौलाना सिद्दीकी याच्या संपर्कात होता. आतिफ याने रशियातून वैद्यकीय शिक्षण घेतले असून तो भारतात वैद्यकीय व्यवसाय चालू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘मेडिकल कौंसिल ऑफ इंडिया’ची परीक्षा उत्तीर्ण होण्यात अपयशी झाला. त्यामुळे त्याने नाशिक येथे अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय चालू केला. त्या माध्यमातून तो रुग्णांना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. आतापर्यंत त्याने किती जणांचे धर्मांतर केले, हे स्पष्ट झालेले नसले, तरी त्याला यासाठी विदेशातून २० कोटी रुपये मिळाले आहेत. मौलाना कलीम सिद्दीकी याला विदेशातून ३ कोटी रुपये मिळाले असल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले असतांना आता आतिफला अटक झाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य पुष्कळ वाढले आहे. (हिंदूंचे धर्मांतर घडवून भारताचे इस्लामीकरण होण्याआधीच हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक)

उत्तर भारतातील धर्मांतर प्रकरण गंभीर आहे. ‘उत्तरप्रदेशमधील विविध शहरांमध्ये जवळपास १ सहस्र लोकांचे धर्मांतर करण्यात आले आहे’, असा आरोप होत आहे. नागरिकांचे धर्मांतर करत असतांना वेगळी पद्धत अवलंबण्यात आली आहे, अशी चर्चा केली जात आहे. विशेष म्हणजे आतिफ याच्या अटकेविषयी नाशिक पोलिसांना कोणतीही माहिती नाही.

कुवैतसह इतर देशांतून निधी गोळा !

आतिफ याला हिंदूंचे धर्मांतर करता येण्यासाठी कुवैतसह जगातील इतर देशांमधून ‘कुणाल’ नाव असलेल्या विविध अधिकोषांतील खात्यांवर २० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. हा निधी कुणाच्या खात्यांतून पाठवण्यात आला आहे, त्यांची सूची सिद्ध करून या व्यक्ती कोण आहेत ? याचे अन्वेषण करण्यात येत आहे. हा निधी केवळ धर्मांतरासाठी वापरायचा होता कि इतर काही कारवायांसाठी, याचे अन्वेषणही उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथक करत आहे.

विश्वस्त संस्थांच्या माध्यमांतून निधी गोळा !

उत्तरप्रदेश येथील आतंकवादविरोधी पथकाने देशाच्या विविध भागांतून आतापर्यंत एकूण १२ जणांना अटक केली आहे. यांतील अनेक जण वेगवेगळ्या विश्वस्त संस्था चालवत होते. या संस्थांसाठी जगातील विविध देशांतून निधी येत होता. या निधीचा धर्मांतरासाठी वापर केला जात होता. आतिफ याच्याप्रमाणे इतर आरोपीही स्वतःची ओळख लपवून इतरत्र रहात होते.