नवी देहली – हिंदू सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या येथील ‘२४ अशोक मार्ग’ येथील घरावर आक्रमण करत त्याची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या घराबाहेरील नावाची पाटी, दिवे आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या.
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता म्हणाले की, असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वी केलेल्या हिंदुद्वेषी विधानांमुळे कार्यकर्ते संतप्त झाल्याने त्यांनी हे आक्रमण केले. प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत रहाण्यासाठी ओवैसी सातत्याने हिंदूविरोधी विधाने करत असतात. त्यामुळेच उत्तरप्रदेशामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रारही प्रविष्ट झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या भावालाही हिंदूविरोधी वक्तव्यामुळे अटक करण्यात आली होती. एका विशिष्ट धर्माच्या लोकांमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी ओवैसी सातत्याने हिंदूंना कमी लेखतात. ओवैसी यांनी त्यांच्या भाषणात हिंदूविरोधी विधाने करू नयेत, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, असे आवाहनही विष्णू गुप्ता यांनी केले आहे.
#AsaduddinOwaisi के दिल्ली स्थित घर में हुई तोड़फोड़ मामले में पुलिस ने 5 लोगों को गिरफ्तार किया हैhttps://t.co/cXJIOCaljm
— AajTak (@aajtak) September 22, 2021
या घटनेला भाजप उत्तरदायी ! – खासदार असदुद्दीन ओवैसी
‘लोकांच्या या कट्टरतेसाठी भाजपच उत्तरदायी आहे. जर एका खासदाराच्या घरावर अशा प्रकारे आक्रमण होत असेल, तर यातून काय संदेश जातो ?’, असा प्रश्न ओवैसी यांनी आक्रमणानंतर विचारला आहे.