१. सेवेची तळमळ
अ. ‘सौ. शिर्केकाकूंची शारीरिक स्थिती पुष्कळ नाजूक आहे, तरी त्या सतत सेवा करत असतात.
आ. त्या प्रतिदिन प्रसारसेवेसाठी बाहेर पडतात आणि वाचक संपर्क आणि प्रवचन घेण्याची सेवा करतात.
इ. त्यांना गेल्या वर्षी अपघात झाला होता. तेव्हा अपघातानंतर काही दिवसांतच त्या सेवेला बाहेर जाऊ लागल्या.
ई. सौ. शिर्केकाकू या वयातही सतत सेवेत रहाण्याचा प्रयत्न करतात.
उ. त्यांना हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या निवासी सेवेला जायचे होते; म्हणून त्यांनी घरी त्या कालावधीसाठी यजमानांसाठी प्रसाद आणि महाप्रसाद यांचे नियोजन करून ठेवले. त्या निवासाच्या ठिकाणी प्रसारसेवा करून आल्यावर केर काढायच्या आणि ‘अजून काही सेवा आहे का ?’, असे विचारून दिसेल ती सेवा लगेच करायच्या.
ऊ. काकूंना रामनाथी आश्रमात जाण्याची पुष्कळ इच्छा होती आणि त्याच वेळी लातूर येथे हिंदु राष्ट्र जागृती सभा असल्यामुळे तिथे प्रसारसेवा चालू होती. ‘त्यांचे यजमान त्यांना दोन्ही ठिकाणी न पाठवता रामनाथी आश्रमात किंवा सभेला कुठेतरी एकाच ठिकाणी पाठवणार’, हे लक्षात घेऊन त्यांनी रामनाथी आश्रमात न जाता लातूर येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या प्रसारसेवेला प्राधान्य दिले.
२. गुरुदेवांप्रती असलेला भाव
अ. काकूंचा गेल्या वर्षी प्रसारसेवेहून येतांना रात्री अपघात झाला. त्या दुचाकीवरून खाली पडल्या. (त्या दुचाकीवर मागे बसल्या होत्या.) त्यांच्या डोक्याला मार लागला होता, तरीही त्या स्थिर होत्या. त्याविषयी बोलतांना काकू सांगतात, ‘गुरुदेव होते; म्हणून मी वाचले.’
आ. हिंदु राष्ट्र जागृती सभेसाठी घेतलेल्या निवासाचे ठिकाण म्हणजे ‘गुरूंचा आश्रम आहे’, असा त्यांचा भाव असल्यामुळे ‘तेथे रहाण्यास मिळाले’, याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञता होती.
३. काकू सतत कृतज्ञताभावात असतात.
– कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर (२३.२.२०२०)