१. कौटुंबिक दायित्व आनंदाने पार पाडणे
‘कांचनताई कुटुंबातील व्यक्तींची चांगल्या प्रकारे काळजी घेते. ती दायित्व घेऊन घरातील सेवा करते. ती दिवसभर सेवा करून कितीही थकलेली असली, तरी सर्वांसाठी रात्रीचा स्वयंपाक करते. ती आई-वडिलांची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक करते.
२. कुटुंबियांना सेवेत आणि साधनेत साहाय्य करणे
२ अ. आईला सेवेत साहाय्य करणे : ती आईच्या सेवेचे नियोजन करते आणि तिला लागणारे सर्व साहित्य आधीच काढून ठेवते. ती आईला पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेत साहाय्य करते.
२ आ. बहिणींना अभ्यास आणि साधना यांत साहाय्य करणे : ती आम्हाला अभ्यास आणि साधना यासाठी साहाय्य करते. ती आमचे पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेसाठी नियोजन करते. ती आम्हाला आमचे महाविद्यालय किंवा शिकवणीवर्ग असलेल्या भागातील वाचकांचे अंक वितरण करण्यासाठी देते.
३. निर्मळ मन
तिला कुणी कधी अकारण बोलले, तरी ती सर्वांशी सहजतेने बोलते.
४. परिपूर्ण सेवा करणे
आमचे उत्तरदायी साधक म्हणतात, ‘‘आम्हाला कांचनताईचा आधार वाटतो. ‘तिला संतसेवा किंवा अन्य कोणतीही सेवा दिली, तरी ती व्यवस्थितच करणार’, याची आम्हाला निश्चिती असते.’’
५. भाव
आमच्या घरी कुणी संत येणार असतील, तर ती तळमळीने घराची स्वच्छता करते. ती संतांना लागणार्या लहान-सहान गोष्टींकडे बारकाईने लक्ष देते. तिने रात्रभर जागून सेवा केली असली, तरी ती सकाळी लवकर उठून तेवढ्याच उत्साहाने सेवा करते.’
– कु. रूपम चौरासिया (कु. कांचन यांची बहीण), समस्तीपूर, बिहार. (२६.१०.२०१८)