धाडसत्रानंतर अभिनेता सोनू सूदवर २० कोटींहून अधिक कर चुकवल्याचा आरोप

नवी देहली – कोरोना महामारीच्या काळात सहस्रो स्थलांतरित कामगारांना त्यांचे मूळ गाव गाठण्यासाठी आर्थिक साहाय्य करणारा चित्रपट अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई आणि देहली येथील कार्यालयांसह अनेक ठिकाणी आयकर विभागाने धाड घातल्यानंतर त्याच्याविरोधात २० कोटी रुपयांपेक्षा अधिक करचोरी केल्याचे समोर आले असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे.


अभिनेत्याने बनावट संस्थांद्वारे बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी पैसे जमा केले आहेत, असे सी.बी.डी.टी.ने म्हटले आहे. सोनू सूदने एफ्.सी.आर्.ए. कायद्याचे उल्लंघन करून ‘क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म’चा वापर करून परदेशी देणगीदारांकडून २.१ कोटी रुपये जमा केले आहेत, असे आयकर विभागाने सांगितले आहे.