भारत ‘हिंदु राष्ट्र’ होण्याची हिंदुविरोधी शक्तींना भीती ! – प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना
शिकागो येथील परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचाराचा प्रयत्न असतांना स्वामी विवेकानंद यांनी तेथे हिंदुत्वाचा झेंडा फडकावला. नेहरूंच्या काळापासून काँग्रेस, साम्यवादी यांनी हिंदूंची अवहेलना केली आहे. जे.एन्.यू., अलिगड मुस्लिम विद्यापीठ येथे उघडपणे हिंदुविरोधी प्रचार केला जातो. हिंदूंनी याचा कडाडून विरोध केला पाहिजे. हिंदुविरोधी शक्तींना भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणार, ही भीती असल्याने ते सतत विरोध करत आहेत. त्यांना आता वेळीच रोखले पाहिजे.
हिंदु विरोधकांच्या आरोपांना पुरावे आणि अभ्यास यांद्वारे सडेतोड उत्तरे दिली पाहिजेत ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रुट्स इन काश्मीर’
ज्या हिंदूंना ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेविषयीचे सत्य ठाऊक नाही, ते परिषदेतून केल्या जाणार्या दुष्प्रचाराला बळी पडू शकतात. हे रोखण्यासाठी हिंदूंना सत्य सांगून त्यांना जागृत केले पाहिजे. विरोधकांची मानसिकता, साधने आणि ते कुठेपर्यंत पोचू शकतात ? हे यातून लक्षात येते. हिंदूंनी प्रसारमाध्यमे, शिक्षण या क्षेत्रांत साम्यवाद्यांचा एकाधिकार होऊ दिला; मात्र आता परिस्थितीत पालट होत आहे. हिंदु धर्म, संस्कृती, जीवनदृष्टी यांविषयी हिंदूंना शिक्षित केले पाहिजे. विरोधकांच्या आरोपांना पुरावे, तर्क आणि अभ्यास यांद्वारे सडेतोड उत्तरे दिली पाहिजेत. हिंदूंना सध्या हाच संघर्ष करावा लागणार आहे.
‘हिंदुत्व’ हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू, झारखंड
हिंदुविरोधी परिषदेमागे मुख्यत: ख्रिस्ती मिशनरी असून हिंदुत्वाला संपवण्यासाठी साम्यवादी आणि कट्टरतावादी धर्मांध त्यांना साहाय्य करत आहेत. ख्रिस्ती मिशनरी आणि कट्टर इस्लामी लोक भारतावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मिशनरींच्या धर्मांतरांचे जाळे सर्वत्र पसरले आहे. त्यांचा सर्वच प्रचार धर्मांतराच्या हेतूने चालू आहे. हे थांबण्यासाठी याला विरोध केला पाहिजे. आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की, ‘हिंदुत्व’ हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
हिंदूंचा जगभरात वाढलेला प्रभाव, ही जागतिक हिंदुविरोधकांची पोटदुखी ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
जागतिक स्तरावर यापुढेही हिंदुविरोधी परिषदा घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहील. हिंदूंचा प्रभाव जगभरात वाढत आहे, ही हिंदुविरोधकांची पोटदुखी आहे. विश्वगुरु म्हणून भारताची ओळख पुढे येत असल्याने हिंदुत्वाला नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. आज अनेक इस्लामी देश आपापसांतच संघर्ष करत आहेत. हिंदूंनी कुठल्या देशाची भूमी हडप करण्यासाठी कधी इतरांवर आक्रमण केले नाही, केवळ प्रतिकारच केला आहे. मानवकल्याण आणि जगभरात शांती स्थापन करणे यांसाठी कार्यरत असलेल्या हिंदु धर्माची महानता सर्वांना सांगायला हवी.
हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर नवनिर्माण करू ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, ‘युथ फॉर पनून काश्मीर’
हिंदुविरोधी परिषदांविषयी हिंदु समाजाने भीती बाळगण्याचे कारण नाही; मात्र सतर्क आणि जागृत असायला हवे. हिंदुत्वाकडे आता जगभरातील लोक आकर्षित होत आहेत. जे काश्मिरी हिंदूंचे ‘डिसमेंटल’ (उच्चाटन) झाले, तसे आतापर्यंत कुणाचेच झालेले नाही. हिंदुद्वेषी हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण आपण हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर नवनिर्माण करू.
हिंदु धर्मविरोधकांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे ! – दीपक गोस्वामी, अध्यक्ष, ज्ञानम् फाऊंडेशन, राजस्थान
हिंदूंनी धर्मशिक्षणासह आत्मरक्षणासाठी आता पुढे यावे ! – आचार्य अशोक, ज्योतिषी, बिहार
भारतापेक्षा नेपाळ येथील हिंदूंची परिस्थिती बिकट आहे. भारत आणि नेपाळ येथील हिंदूंना एका सूत्रात जोडून हिंदुत्वाचे कार्य करायला हवे ! – माधव भट्टराई, माजी राजगुरु, नेपाळ
हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन रोखण्यासाठी युवकांमध्ये जागृती करावी लागेल. – श्री. राधाकृष्णन्, तमिळनाडू राज्यप्रमुख, शिवसेना
देशातील हिंदु समाजाने वैचारिक स्तरावर विरोध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तसेच प्रत्येक दृष्टीने सिद्ध व्हावे लागेल. – श्री. बिनील सोमसुंदरम्, अन्नपूर्णा फाऊंडेशन, केरळ
विविध हिंदु संघटनांना एकत्रित जोडून त्यांचा योग्य समन्वय घडवून आणण्याची क्षमता पुष्कळ अल्प संघटनांमध्ये असते. ही क्षमता हिंदु जनजागृती समितीमध्ये आहे; मात्र हिंदुत्वाचे कार्य आणि हिंदूंची शक्ती वाढवायला हवी. – श्री. अनिर्बान नियोगी, बंगाल
हिंदूंवरील धर्मसंकटाचा संघटितपणे सामना करायला हवा ! – कुरु थाई, अरुणाचल प्रदेश
हिंदुविरोधी कार्यक्रमांवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत ! – पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज, शदाणी दरबार, रायपूर, छत्तीसगड
भारतात होऊन गेलेल्या ऋषीमुनींची माहिती जाणल्यावर देश आणि हिंदुत्व यांविषयी कुणालाही अभिमान वाटेल, असा हिंदूंचा इतिहास आहे. हिंदु धर्मात बंधुत्व आणि स्वतंत्रता असून हिंदु धर्म विश्वकल्याणकारी आहे. असे असतांना साम्यवाद्यांकडून जागतिक स्तरावर हिंदुविरोधी अभियान राबवून हिंदु धर्माला निरर्थक ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हिंदुविरोधी कार्यक्रमांवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत.
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे महाआंदोलन सर्व हिंदूंपर्यंत पोचवावे लागेल ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, शास्त्रधर्म प्रचार सभा, बंगाल
सनातन हिंदु धर्म शाश्वत आणि विश्वकल्याणकारी आहे. हिंदूंना आपल्या शास्त्राविषयी अवगत करून त्यांना जागृत करावे लागेल. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे महाआंदोलन बंगालसह सर्व हिंदूंपर्यंत पोचवावे लागेल.
हिंदु धर्म हा अनादी धर्म आहे. हिंदु धर्म नष्ट करण्याचे हिंदु विरोधकांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. हिंदू जेवढे शिक्षित, तेवढेच ते धर्मापासून दूर गेल्याचे आढळून येते. अन्य धर्मांत असे दिसून येत नाही. – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, वारकरी पाईक संघ
साम्यवाद्यांनी केलेल्या नरसंहाराचे वास्तव जगासमोर आणायला हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
यापूर्वीही ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ यांसारख्या विविध परिषदा आणि कार्यक्रम यांतून हिंदु धर्मावर वैचारिक आक्रमण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. या परिषदेला जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जे.एन्.यू.), अलिगड मुस्लिम विद्यापीठ येथील वक्ते, ८ चर्च, ३ पाकिस्तानी संघटना, विदेशातील विश्वविद्यालये आणि प्रायोजक यांचा हिंदुविरोधी षड्यंत्राला पाठिंबा होता. हिंदु धर्माविषयी घृणा निर्माण केल्याने विदेशात शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आत्मगौरव रहाणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदु युवकांना होणारा हा मानसिक त्रास पहाता त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हिंदु युवकांना जागृत करावे लागेल. हिंदु धर्मावरील हे वैचारिक आक्रमण दुर्लक्षित करून चालणार नाही. साम्यवादी यांनी केलेल्या नरसंहाराविषयीचे वास्तव जगासमोर आणायला हवे.